US IRAN PEACE DEAL ENDS 108-DAY WAR | TRUMP ANNOUNCES HISTORIC AGREEMENT | MIDDLE EAST PEACE NEWS Saam Tv
देश विदेश

US Iran Peace Deal : अमेरिका इराणच्या १०८ दिवसांच्या युद्धाला पूर्णविराम! १० कलमी शांती करारात अटी काय?

US Iran Peace Deal Update News : अमेरिका आणि इराण यांच्यात १०८ दिवसांच्या संघर्षानंतर ऐतिहासिक शांतता करारावर सहमती झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत युद्ध संपल्याचा दावा केला आहे.

Alisha Khedekar

  • अमेरिका आणि इराण यांच्यातील १०८ दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध संपणार

  • दोन्ही देशाची ऐतिहासिक शांतता करारावर सहमती

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीची घोषणा केली

  • करारानंतर जागतिक तेल बाजारात घसरण

  • भारतातील इंधन व सोन्याच्या दरांवर परिणाम होण्याची शक्यता

US IRAN PEACE DEAL ENDS 108-DAY WAR गेल्या १०८ दिवसांपासून सुरु असलेल्या अमेरिका इराण युद्धाला अखेर ब्रेक लागणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता करार झाल्याची घोषणा केली असून, इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलनेही या दाव्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे तब्बल ४ महिने चाललेल्या संघर्षानंतर मध्यपूर्वेत शांततेची आशा निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात १० कलमी शांतता करारावर सहमती झाली आहे. १९ जून रोजी दोन्ही देशांमध्ये जिनिव्हा करार होणार होणार आहेत. इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष बाघेर गालीबाफ उपस्थित राहणार असून, अमेरिकेकडून उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स करारावर स्वाक्षरी करतील.

करारातील महत्त्वाच्या अटींमध्ये लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर कायमस्वरूपी शस्त्रसंधी, इराणने अण्वस्त्रनिर्मिती न करण्याची हमी, होर्मुज सामुद्रधुनीतील निर्बंध हटवणे आणि इराणवरील तेल व इंधनावरील निर्बंध हटवणे यांचा समावेश आहे. तसेच अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि आखात क्षेत्रात अतिरिक्त लष्करी तैनातीही करणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय इराणसाठी अमेरिका ३०० अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असून जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हा दिलासादायक बाब मानली जात आहे. या युद्धाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याने झाली होती. त्यानंतर हिजबुल्लाहच्या सहभागामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला. अनेक प्रयत्नांनंतरही शांतता चर्चा निष्फळ ठरत होत्या. मात्र जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला आणि अखेर शांतता कराराच्या दिशेने निर्णायक प्रगती झाली. दरम्यान आता भारतातील सोने चांदी, इंधन दरांमध्ये काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diva Junction : 'दिवा जंक्शन'जवळील ५ मनमोहक पर्यटन स्थळे, पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लान कराच

Maharashtra News Live Update : वाळूज औद्योगिक परिसरातील प्लास्टिक स्क्रॅपला आग; मोठा अनर्थ टळला

Singer Death : हवेत दोन हेलिकॉप्टरची टक्कर; प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू, संगीत विश्वावर शोककळा

Weak heart signs: त्वचेवर ही 5 लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Water Crisis : पुणेकरांवर पाणीसंकट! 'या' भागात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT