Rising US-Iran tensions as Donald Trump hints at a major military strike soon. 
देश विदेश

युद्ध भडकलं! इराणवर सर्वात मोठा हल्ला कधी होणार? ट्रम्प यांनी सांगितली तारीख

Donald Trump Warn To Iran: वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या हल्ल्याचे संकेत दिले आहेत. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ येत्या काही आठवड्यांत अधिक तीव्र होऊ शकते.

Bharat Jadhav

  • Donald Trump यांचा इराणवर हल्ल्याचा इशारा

  • पुढील २-३ आठवड्यांत कारवाईची शक्यता

  • ‘Operation Epic Fury’ अंतर्गत लष्करी हालचाली सुरू

पश्चिम-आशियामधील (मध्य पूर्वेत) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी २ एप्रिल रोजी अमेरिकेच्या नागरिकांना संबोधित केलं. यात त्यांनी युद्धातबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत इराणाला अश्मयुगात पाठवणार, त्याची तीच जागा असल्याचं म्हणत इराणवर जोरदार हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.

दरम्यान इराणच्या अध्यक्षांनी युद्ध बंद करण्याबाबत अमेरिकेकडे विनंती केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र इराण ट्रम्प यांचा दावा खोडून काढत युद्धात माघार न घेण्याची भूमिका घेतली. त्यानंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकनं नागरिकांना संबोधित केलं. आपले युद्ध अजून संपलेले नाही. 'ऑपरेशन एपिक फ्युरी' सुरू आहे.

पुढील दोन ते तीन आठवड्यांत अधिक कठोर भूमिका घेतली जाईल. इराणमधील प्रमुख टार्गेट पूर्णत्वाच्या जवळ पोहोचली आहेत. 'आमची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आम्ही आमची मोहीम सुरूच ठेवू. अमेरिका लवकरच आमची सर्व उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या मार्गावर आहे,' असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.

"पुढील दोन ते तीन आठवड्यांत आम्ही त्यांना खूप जोरदार दणका देणार आहोत. आम्ही त्यांना पुन्हा अश्मयुगात घेऊन जाऊ, जिथे त्यांचे खरे स्थान आहे." अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "ऑपरेशन फ्युरी" सुरूच राहील. आज संध्याकाळी बोलताना अमेरिकन लष्कराचे 'ऑपरेशन एपिक फ्युरी' सुरू होऊन केवळ एक महिना झाला आहे, असे ते म्हणाले. गेल्या चार आठवड्यांत आपल्या सैन्याने रणांगणावर निर्णायक आणि जबरदस्त विजय मिळवले आहेत. असा विजय जो यापूर्वी फार कमी लोकांनी पाहिला असेन, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की, जर कोणताही करार झाला नाही, तर त्यांच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल. जर ते करारासाठी सहमत झाले नाहीत, तर आम्ही त्यांच्या सर्व वीज निर्मिती प्रकल्पांवर, शक्यतो एकाच वेळी, मोठा हल्ला करू,असे ट्रम्प म्हणालेत. इराणमधील सत्तापालटाच्या संदर्भात, ट्रम्प म्हणाले की, हा हल्ला सत्तापालटाच्या उद्देशाने कधीच केला गेला नव्हता, उलट त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूमुळे सत्तापालट झाला आहे.

त्यांनी पुनरुच्चार केला की इराणचे नौदल उद्ध्वस्त झाले आहे, हवाई दल पूर्णपणे मोडीत निघाले आहे आणि त्यांचे बहुतेक सर्वोच्च नेते आता मृत्युमुखी पडले आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सवरील त्यांचे नियंत्रण आणि आदेश पूर्णपणे संपुष्टात आणले जात आहेत. युद्धाच्या इतिहासात यापूर्वी कधीही कोणत्याही शत्रूला अवघ्या काही आठवड्यांत इतके अचूक आणि प्रचंड नुकसान सोसावे लागले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदीदारांना मोठा झटका! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; पाहा तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

SCROLL FOR NEXT