Netanyahu Faces  
देश विदेश

"मी नसतो तर तुरुंगात असता!" ट्रम्प यांनी फोनवर नेतान्याहूंना कडक शब्दात झापले; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ

Trump Netanyahu phone call controvers : डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांना फोनवर झापल्याचा दावा समोर आला आहे. लेबनॉनमधील घडामोडी, युद्धबंदी चर्चा आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर या कथित संभाषणाची जगभरात चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

Donald Trump Latest News : "मी नसतो तर तुम्ही आज तुरुंगात असता!"... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांना फोनवर अशी कडक तंबी दिल्याचा मोठा दावा समोर आला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इराण आणि इस्रायलमधील तणाव निवळण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. पण या दरम्यान ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात फोनवर हाय-व्होल्टेज ड्रामा घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर ट्रम्प प्रचंड संतापले होते. त्यांनी फोनकरून इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांना झापल्याचे वृत्त समोर आले आहे.

अॅक्सिऑस यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांच्यातील फोनवरील संभाषणाचे वृत्त दिले आहे. ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना फोनवर वेडा आहेस का? मी नसतो तर तुरूंगात असता.. अशी थेट धमकी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायलच्या वाढत्या लष्करी कारवाईमुळे ट्रम्प नाराज झाले. कारण त्यामुळे इराणसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेत अडथळा येऊ शकते . दरम्यान, ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही, इस्रायली सैन्याने सांगितले की लेबनॉनमधून इस्रायली भूभागाच्या दिशेने दोन रॉकेट डागण्यात आले, जे हवेतच पाडण्यात आले.

तुम्ही पूर्णपणे वेडे आहात

सूत्रांच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांनी नेतान्याहूंना कडक शब्दांत झापलंय. "माझ्या पाठिंब्यामुळेच तुम्ही खुर्चीवर आहात, नाहीतर आज तुरुंगात असता", असं ट्रम्प यांनी थेट सुनावल्याचं म्हटलं जातंय. ट्रम्प नेतान्याहू यांना म्हणाले, "तुम्ही पूर्णपणे वेडे आहात. जर मी नसतो, तर तुम्ही आतापर्यंत तुरुंगात असता. मी तुमचा जीव वाचवत आहे. आता प्रत्येकजण तुमचा द्वेष करतो. म्हणूनच प्रत्येकजण इस्रायलचा द्वेष करतो." ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर इस्रायलने माघार घेतल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात आहे.

तणाव अखेर निवळला -

इराण आणि अमेरिकेदरम्यान शस्त्रसंधीवरून (Ceasefire) निर्माण झालेला मोठा तणाव अखेर निवळला आहे. इस्रायलने आपल्या सैन्याला लेबनॉनमध्ये शिरण्याचे आदेश दिल्यानंतर ही चर्चा काही काळ थांबली होती. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आता इस्रायल आणि हिजबुल्ला यांनी एकमेकांवरील हल्ले थांबवण्याचे मान्य केले आहे. इस्रायली सैन्य लेबनॉनमधून अखेर माघारी फिरले आहे. तणाव कमी झाल्यानंतर आता इराणसोबत अत्यंत वेगाने चर्चा सुरू असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशेज घाट मार्ग पुर्ण बंद; पर्यायी मार्गांवर रात्रभर वाहतूक कोंडी, पर्यटकांचे हाल

अवघ्या ५ मिनिटांत करा दुधी भोपळ्याचे मऊ आणि कुरकुरीत थालीपीठ

Maharashtra infrastructure : केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, तब्बल ७ हजार २२ कोटींचा दिला अतिरिक्त निधी

Sunday Horoscope : घाईत निर्णय घेणं टाळा, ४ राशींच्या व्यक्तींचा दिवस भरभराटीचा जाणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

बोलता बोलता अचनाक थांबले अन् स्टेजपासून दूर गेले; भाषणावेळी अमित ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT