US naval presence rises near the Strait of Hormuz as tensions with Iran escalate, raising fears of global conflict. saam tv
देश विदेश

होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा ठप्प?अमेरिकेकडून इराणची सागरी नाकेबंदी

US Iran Conflict: इराण-अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा शिगेला पोहोचलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सागरी नाकेबंदी करण्याची घोषणा केलीये. मात्र त्यातच अमेरिकेच्या या घोषणेमुळे पुन्हा युद्ध पेटणार आहे... ते कसं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

इस्लामाबादमधील चर्चा फिस्कटल्यानंतर इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलायं. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सागरी नाकेबंदी करण्याचे आदेश अमेरिकन नौदलाला दिलेत. इतकंच नाही तर अमेरिकन नौदलानं आता इराणच्या सर्व बंदरांना वेढा घालण्याची तयारी केलीये. त्यामुळे होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे. मात्र, ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर आता चीनचा पारा चांगलाच वाढलाय. 'आमच्या व्यवहारात लक्ष देऊ नका' असं म्हणत चीननं थेट अमेरिकेला शिंगावर घेतलंय.

चीनची जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सतत ये-जा करताहेत. आम्ही त्यांचा आदर करू आणि इतरांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असा इशारा चीननं अमेरिकेला दिलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण आहे आणि ती आमच्यासाठी खुली आहे, असं चीननं स्पष्ट केलंय.

वाटाघाटीतून काही हाती न लागल्याने अमेरिकेनं पुन्हा एकदा इराणची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र, आयआरसीजीनं अमेरिकेच्या प्रत्येक हालचालींना जशास तसं उत्तर देण्याचे मनसुबे उघड केलेत. एव्हंढच नाही तर होर्मुझच्या मुद्द्यावरून आता अमेरिकेच्या विरोधात चीननं उडी घेत थेट आव्हान दिलंय. त्यामुळे जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाचा असलेल्या होर्मुझ जलमार्गावरून मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडणार का, याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update: राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT