Tensions rise in the Middle East as Iran warns the United States of severe consequences if attacked Saam Tv
देश विदेश

हल्ला कराल तर मध्य-पूर्वेत रान पेटेल, इराणची अमेरिकेला धमकी

US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष टोकाला पोहचलाय.एकीकडे अमेरिकेनं इराणवर हल्ल्याचा इशारा दिलेला असतानाच आता इराणनेही आक्रमक पवित्रा घेतलाय. आमच्यावर हल्ला केला तर मध्य पूर्वेत गंभीर परिणाम पाहायला मिळेल असा इशाराच इराणने दिलाय.

Omkar Sonawane

खोमेनींची अमेरिकेला धमकी

इराणवर अमेरिकेनं कोणताही लष्करी हल्ला केला, तर मध्य-पूर्वेत प्रादेशिक युद्ध

संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष पसरेल

आम्ही चिथावणीखोर नाही, आम्हाला कोणत्याही देशावर हल्ला करायचा नाही

जो कोणी हल्ला करेल किंवा त्रास देईल त्याला इराण योग्य उत्तर देईल

अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वादानं आता टोक गाठलंय. अमेरिकेनं आपली यूएसएस अब्राहम लिंकन युद्ध नौका मध्य पूर्वेत तैनात केल्यानंतर इराणही आक्रमक झालाय. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर आम्हीही शांत बसणार नाहीत. मध्य पूर्वेत त्यांचे गंभीर परिणाम पाहायला मिळतील अशा शब्दात पुन्हा एकदा इराणने अमेरिकेला सुनावलंय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे प्रमुख आयातुल्ला खोमेनी यांनी हा इशारा दिलाय. पाहूयात खोमेनी नेमकं काय म्हणालेत..

खोमेनींची अमेरिकेला धमकी

इराणवर अमेरिकेनं कोणताही लष्करी हल्ला केला, तर मध्य- पूर्वेत प्रादेशिक युद्ध सुरू होईल. यामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष पसरेल असं खोमेनी यांनी म्हंटलंय. आम्ही चिथावणीखोर नाही आणि आम्हाला कोणत्याही देशावर हल्ला करायचा नाही. मात्र, जो कोणी हल्ला करेल किंवा त्रास देईल त्याला इराण राष्ट्र योग्य उत्तर देईल. असं सांगत खोमेनी यांनी युद्धाला तोंड फोडलंय.

खोमेनींच्या याच विधानामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढलीय. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं. यावर बोलताना खोमेनी यांनी या आंदोलनाची तुलना देशाच्या धार्मिक व्यवस्थेला आव्हान देणार्‍या बंदसोबत केली होती. तसच आंदोलनात सहभागी होणार्‍या हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. अनेकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे या आंदोलकांना मृत्युदंडाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेची विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन आणि त्याच्यासोबत असलेल्या अमेरिकन युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. इराणवरील दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय. अमेरिकेच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेता इराणनेही होर्मुझच्या धोरणात्मक सामुद्रधुनीत लष्करी सरावांची योजना आखलीय. या ठिकाणावरून जगातील तेलाचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. त्यामुळे आता हे दोन्ही देश युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

Pune : बुधवार पेठेत पोलिसांची पुन्हा अचानक छापेमारी, ४ महिलांची सुटका, भोपसिंगला ठोकल्या बेड्या

UPSC Topper: आधी MBBS; डॉक्टर सोडून दिली UPSC; देशात रँक १ मिळवणारे अनुज अग्निहोत्री आहेत तरी कोण?

Upit Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट उपीट, जाणून घ्या सोपी रेसिपी

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

SCROLL FOR NEXT