Symbolic image representing rising geopolitical tensions between the United States and Iran amid alleged covert military strategies in West Asia. Saam Tv
देश विदेश

अमेरिका घेणार इराणी दहशतवाद्यांची मदत? इराणला घेरण्यासाठी अमेरिकेचा प्लॅन पक्का

US Iran Conflict: इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनींचा खात्मा करून अमेरिका थांबलेली नाहीये. इराणमधील खामेनींची राजवट पुसून टाकण्यासाठी अमेरिकेनं आता नवी योजना आखलीये.. सीआयएचा नवा प्लॅन काय आहे ? पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट

Omkar Sonawane

विध्वसंक क्षेपणास्त्रांनी इराणला खिळखिळं करुनही, खामेनींना संपवूनही इराण काही हात टेकायला तयार नसल्याचं दिसतंय. म्हणून आता अमेरिकेनं बाहेरुन नाही तर इराणमध्ये घुसून इराणला संपवण्याचा मास्टर प्लॅन आखलाय. इराणला संपवण्याचा हा प्लॅन काय आहे पाहा,

कुर्दिश दलासोबत अमेरिका मैत्री करणार

अमेरिका कुर्दिश सैन्यांना शस्त्रं पुरवणार

कुर्दिश सशस्त्र दल इराण आर्मीला घेराव घालणार

उत्तर इराण कुर्दिश ताब्यात घेण्याचा प्लॅन

इराणी नागरिकांना पळून जाण्यास कुर्दिश दल मदत करणार

ट्रम्प प्रशासन इराकमधील कुर्दिश नेत्यांशी लष्करी मदत पुरवण्याबाबत चर्चा करत असून इराणच्या रस्त्यारस्त्यावर आता गृहयुद्ध पेटणारेय. इराणच्या पश्चिमेकडील प्रदेशांवर दबाव वाढवण्यासाठी आणि लष्करी दलांविरोधात आघाडी घेण्याची ही मोठी रणनिती ट्रम्पनं आखलीये. यामुळे इराणपुढे अमेरिकासारखा बलाढ्य शत्रू आणि कुर्दिश दलामुळे अंतर्गत राजकीय आव्हानांवर लढण्याची वेळ आलीये. यामुळे विशाल इराणची प्रादेशिक समिकरणंच बदलण्याचा अमेरिकेचा इरादाये. तर इस्रायल पुढची आव्हानंही आता अरब राष्ट्रांनी वाढवलीये.

अरब राष्ट्रांकडून मोसादच्या एजंट्सना अटक

अरब राष्ट्रांनी फॉल्स फ्लॅगचा कट उधळला

इस्त्रायल विरोधात आखाती देशात रोष?

एकीकडे अमेरिकेनं खामेनींच्या मृत्यू नंतर उधळलेल्या इराणला लगाम लावण्यासाठी थेट दहशतवाद्यांशी हात मिळवणी केलीये. त्यामुळे इराणला संपवण्यासाठी अमेरिकेनं पुन्हा ओसामा बिन लादेन तयार केलाय की काय असा सवालये तर दुसरीकडे इस्त्रायल विरोधात आखाती देशांच मन वळवण्याचा इराणचा प्रयत्न सफल झाल्यास या युद्धाचं उद्याचं चित्र हे नक्कीच बघण्यासारखं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: 'माझं पूर्ण नावं नीट ऐका...'; अभिनेत्री ज्ञानदा अडकली लग्नबंधनात, खास उखाणा घेत सांगितली सगळी लव्हस्टोरी

Maharashtra News Live Update: अशोक खरातला शिर्डीतील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sayali Sanjeev: साजिरं रुप तुझं दडलं मनात ग...

आधी गर्लफ्रेंडसोबत खटके उडाले, नंतर इन्स्टाग्रामवरून धमक्या आल्या अन्... कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

SCROLL FOR NEXT