US attacks Indian ship 
देश विदेश

US attacks Indian ship : अमेरिकेचा भारतीय जहाजावर हल्ला, 3 खलाशांचा मृत्यू

US Hellfire missile Indian sailors : ओमान किनारपट्टीजवळ अमेरिकेने भारतीय खलाशी असलेल्या 'एमटी जलवीर' जहाजावर हेलफायर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून भारताने अमेरिकेच्या उपराजदूतांना समन्स बजावले आहे.

Namdeo Kumbhar

US attacks Indian ship : अमेरिकी सैन्यानं भारतीय खलाशी असलेल्या एमटी जलवीर जहाजावर हेलफायर क्षेपणास्त्रं डागल्याची कबुली दिली आहे. गेल्या चार दिवसांतील हा तिसरा हल्ला असून यात तीन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इराणच्या नाकेबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकेनं ही कारवाई केली. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत भारत सरकारनं अमेरिकेच्या उप-राजदूतांना तातडीनं समन्स बजावलं आहे. सरकारने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला असून, हे हल्ले थांबले पाहिजेत असा आग्रह धरला आहे.

अमेरिकेचा नाकेबंदीचा आरोप:

इरानच्या नाकेबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही लष्करी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकी सैन्याने स्वतः या क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुली दिली असून, यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताचे अमेरिकेला समन्स :

या गंभीर घटनेची दखल घेत भारत सरकारने अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिका घेतली आहे. भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. तसेच, या घटनेचा जाब विचारण्यासाठी भारताने अमेरिकेच्या उपराजदूतांना तातडीने समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांत समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे.

जहाजावरील २१ भारतीय कर्मचाऱ्यांना बाहेर काढले : परराष्ट्र मंत्रालय

नौवहन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, सेट्टेबेलो जहाजावरील उर्वरित सर्व २५ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्यामध्ये २१ भारतीय, दोन पाकिस्तानी, एक रशियन आणि एक युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, सीमन वेल्फेअर फंड सोसायटीला प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्यास सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, हल्ला झालेल्या तीन जहाजांपैकी दोन जहाजे अमेरिकेच्या ट्रेझरीच्या परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाद्वारे प्रशासित निर्बंधांच्या अधीन होती, तर 'सेट्टेबेलो'ला नियमांचे पालन न करणारे म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT