Smoke rises after reported US strike targeting Iran’s strategic Kharg Island oil export terminal in the Persian Gulf Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! ट्रम्पनं खर्ग बेटाचा केला नरक; इराणच्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावर हल्ला

Iran’s Oil Lifeline Targeted: अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानं जग हादरलंय. इराणच्या अर्थव्यवस्थेवरचा हा हल्ला असल्याचं बोललं जातंय. अमेरिकेनं इराणवर कुठे आणि कधी हल्ला केलाय ? इराण खचणार की प्रत्युत्तर देणार? पाहूया एक रिपोर्ट..

Snehil Shivaji

रमाझानचा अलविदा जुम्मा साजरा करुन झोपी गेलेल्या इराणवर अमेरिकेनं पहाटे सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला. यात इराणची लाईफ लाईनच उद्ध्वस्त झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय. हॉमुर्जची सामुद्रधुनी बंद करुन इराणनं आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांना बेचिराख केल्यानंतर संतापलेल्या अमेरिकेनं इराणची लाईफलाईन असलेल्या खर्ग बेटावर हल्ला चढवला. ज्या खर्गला अमेरिकेनं निशाण्यावर घेतलं तो खर्ग इराणसाठी किती महत्वाचा आहे पाहा,

खर्ग बेटाचं महत्त्व काय?

इराणचं कच्च्या तेलाच्या निर्यातीचं सर्वात मोठं केंद्र

दररोज 70 लाख बॅरलपर्यंत तेल जहाजांमध्ये भरण्याची क्षमता

खर्ग बेटावरुन एकूण कच्च्या तेल निर्यातीपैकी 90% निर्यात

खर्ग बेटावरून वर्षाला 95 कोटी बॅरल कच्च्या तेलाची निर्यात

इराणच्या लष्कराला मिळणारा मोठा निधी खर्ग बेटावरून होणाऱ्या व्यापारातून

इराणच्या उत्तरेकडील पर्शियन आखातात असलेले खर्ग बेट हे देशाच्या तेल निर्यातीचे सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे. इराणच्या मुख्य भूभागापासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर असलेलं खर्ग हे इराणच्या उर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचं बेट असून याच बेटाला लक्ष्य केल्यानंतर ट्रम्प यांनी

खर्ग'वरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा

आमच्याकडे अत्याधुनिक आणि सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र

संयम ठेवत ऑईल इन्फ्रास्ट्रक्चरला उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला नाही

इराणनं होर्मुझवरून जाणाऱ्या जहाजांच्या प्रवासात अडथळा आणल्यास पुनर्विचार करणार

इराणच्या राष्ट्रप्रमुख आणि लष्करप्रमुखांना संपवून, लष्करी तळांना बेचिराख करुनही इराणनं बलाढ्य अमेरिकेला तब्बल 15 दिवस झुंजवलंय. दोन दोन देश हल्ले करत असतांना एकट्या इराणं इस्रायल सोबतच ७ ते ८ देशांमध्ये घुसून अमेरिकेची तळं उद्धवस्त केलीये. त्यामुळे आता इतकी शक्ती लावूनही इराण माघार घेत नाही असं दिसताच अमेरिकेनं त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे इराण या हल्ल्याला कसं उत्तर देणार? आणि अमेरिकेविरोधात कोणतं पाऊल उचलणार याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

SCROLL FOR NEXT