Instagram Updates Saam Tv
देश विदेश

Instagram Reels : बायको इन्स्टाग्रामवर सतत रील्स बनवायची, नवऱ्याने कंटाळून जीवन संपवलं

Karanataka News : पत्नीला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची सवय होती. यावरुन दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असतं.

प्रविण वाकचौरे

Karnataka News :

पत्नीच्या सतत इन्स्टाग्राम वापराच्या सवयीमुळे पतीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चामराजनगर भागातील ही घटना आहे. पत्नी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुमार असं आत्महत्या केलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कुमार रोजंदारीवर काम करत होता. त्याच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची सवय होती. यावरुन दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असतं. मात्र पत्नी काहीही ऐकण्यास तयार नव्हती. पतीच्या विरोधानंतरही ती सतत इन्स्टाग्रामवर रील्स बनवत असे.

पोलिसांनी सांगिगले की, कुमारने आपल्या पत्नीच्या इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या सवयीला विरोध केला. मात्र पत्नी याकडे दुर्लक्ष करत असे. जेव्हा गोष्टी टोकाला पोहोचली त्यावेळी कुमारने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Crime News)

इंडियने एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कुमार आणि रुपाच्या लग्नाला जवळपास १० वर्ष झाली होती. दोघांना दोन मुली देखील आहेत. कुमार रोजंदारीवर काम करुन आपलं कुटुंब चालवत होता. मात्र त्याच्या मद्यपानाच्या सवयीमुळे देखील दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अलीकडेच रूपा कुमारला सोडून तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली.

रूपाने एका दुसऱ्या पुरुषासोबत एक रील काही दिवसांपूर्वी अपलोड केली होता. त्यावेळी कुमारने रूपाला या रीलबद्दल विचारणा केली. यावरुन त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर दुर्दैवाने कुमारने आत्महत्या केल्याची माहितीदेखील समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT