UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सोमवारी 12 जून रोजी UPSC प्राथमिक परीक्षेचा निकाल 2023 जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेतून आयोगाने नागरी सेवेसाठी मुख्य परीक्षेतून 14,624 जणांची निवड केली.
UPSC नागरी सेवा परीक्षेला बसलेले उमेदवार आता आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन परीक्षेचा निकाल (Result) पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवार या स्टेप (Steps) फॉलो करू शकतात
1. कसा तपासाल निकाल ?
उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट (Website) upsc.gov.in वर लॉगिन करा.
होम पेजवर उपलब्ध असलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स रिझल्ट 2023 लिंकवर क्लिक करा.
एक नवीन PDF फाईल उघडेल जिथे उमेदवार त्यांचे निकाल पाहू शकतात.
2. हेल्पलाइन नंबर
निकालाशी संबंधित माहितीसाठी उमेदवार लोकसेवा आयोग कॉम्प्लेक्स, धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली येथील परीक्षा सेंटरजवळ केंद्राशी संपर्क साधू शकतात. तसेच उमेदवार दूरध्वनी क्र. ०११-२३३८५२७१, ०११-२३०९८५४३ किंवा ०११-२३३८११२५ वर संपर्क साधू शकतात. अजून चौकशीसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत चौकशी करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.