Uttar Pradesh 13 PCS officers new posting list saam tv
देश विदेश

PCS Officer Transfer: राज्यातील प्रशासकीय विभागात मोठा फेरबदल; १३ PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

UP Administrative Reshuffle: उत्तर प्रदेश सरकारने 13 PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पाच जिल्ह्यांतील ADM अधिकाऱ्यांसह विविध विभागांतील अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Bharat Jadhav

  • उत्तर प्रदेशात 13 PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • पाच जिल्ह्यांतील ADM स्तरावरील अधिकाऱ्यांचाही फेरबदल करण्यात आला आहे.

  • पवन कुमार यांना ADM (वित्त व महसूल), कुशीनगर, तर दिनेश यांना ADM (नगर), अयोध्या पदाची जबाबदारी देण्यात आली.

उत्तर प्रदेश सरकारने प्रशासकीय रचनेत फेरबदल करत १३ प्रांतीय नागरी सेवा (PCS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने जारी केलेल्या बदलीच्या यादीनुसार विविध जिल्ह्यांत आणि विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, मुख्य महसूल अधिकारी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी आणि विविध संचालनालयांशी संबंधित पदांचा समावेश आहे. या बदल्यांद्वारे अधिकाऱ्यांवर विविध जिल्हे आणि विभागांमध्ये नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

कुशीनगरमध्ये पवन कुमार यांच्यावर नवी जबाबदारी

बदलीच्या यादीनुसार, उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाना महासंघाचे महाव्यवस्थापक पवन कुमार यांची कुशीनगरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (वित्त व महसूल) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. आता ते जिल्ह्यातील वित्त आणि महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाच्या प्रशासकीय कामांची जबाबदारी सांभाळतील.

मऊ येथे मुख्य महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दिनेश यांची अयोध्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (शहर) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. अयोध्या येथील नवीन नियुक्तीमुळे, दिनेश शहरी प्रशासन आणि नागरी व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या स्वीकारतील. शहरी क्षेत्रातील प्रशासकीय समन्वय, महसूल आणि विकास यांसारख्या बाबींमध्ये 'अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (शहर)' ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

सौरभ सिंह यांची कानपूर नगर येथे नियुक्ती

मथुरा महानगरपालिकेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या सौरभ सिंह यांची कानपूर नगरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (शहर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीमुळे त्यांच्यावर एका मोठ्या शहरी भागातील प्रशासकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कानपूर नगरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (शहर) म्हणून, ते शहरी प्रशासनाशी संबंधित विविध बाबींवर देखरेख करण्याची जबाबदारी सांभाळतील.

दरम्यान कानपूर नगरमध्ये यापूर्वी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (शहर) म्हणून कार्यरत असलेले आलोक कुमार गुप्ता यांची आता कासगंजचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (वित्त आणि महसूल) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन भूमिकेत ते जिल्ह्यातील वित्त आणि महसूल विभागाशी संबंधित प्रशासकीय कामकाज पाहतील.

अरुण कुमार यांची मत्स्यव्यवसाय संचालनालयात बदली

बदलीच्या यादीत अरुण कुमार यांचाही समावेश आहे. याआधी ते चित्रकूट येथे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (न्यायिक) आणि उपसंचालक (चकबंदी) म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती लखनऊ येथील उत्तर प्रदेश मत्स्यव्यवसाय संचालनालयात सहसंचालक (प्रशासन) या पदावर करण्यात आली आहे. लखनऊस्थित या संचालनालयातील आपल्या नवीन नियुक्तीदरम्यान, ते प्रशासकीय कामांसोबतच विभागीय कामकाजाचे व्यवस्थापन आणि समन्वय पाहण्याची जबाबदारी सांभाळतील. दरम्यान, मथुरेमध्ये उप-विभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कांचन यांची चित्रकूटचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (न्यायिक) आणि उपसंचालक (चकबंदी) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची बैठक पार पडली

काँग्रेसचा दारुण पराभव; अपक्ष उमेदवाराचा दणदणीत विजय, भाजप प्रणित संघटनेची काय स्थिती?

Sunday Horoscope: रविवार ठरणार लकी! गणेशोत्सवात 'या' राशींच्या आयुष्यात येणार पैसा आणि आनंद; वाचा उद्याचे राशीभविष्य

Mysterious Beach : भारतातील सर्वात रहस्यमय समुद्रकिनारा, ज्याचे पाणी पाहता पाहता होते गायब

Karlyacha Juice: रोज १५ दिवस कारल्याचा ज्यूस प्यायल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT