Karni Sena Workers Attacked On Samajwadi MP Convoy  
देश विदेश

UP News: समाजवादी खासदाराच्या ताफ्यावर हल्ला; करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनांवर फेकले टायर, एकमेकांवर आदळल्या गाड्या

Karni Sena Workers Attacked On Samajwadi MP Convoy : लोढा पोलीस स्टेशन परिसरातील खेरेश्वर चौराहा महामार्गावर सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला झालाय.

Bharat Jadhav

समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. यादरम्यान खासदारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या. खासगदार रामजीलाल सुमन यांच्या ताफा जेव्हा लोढा पोलीस स्टेशन परिसरातील खेरेश्वर चौक महामार्गावरून जात होता, त्यावेळी हा अपघात झाला. या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना पाहून ताफ्यातील वाहन चालकांमध्ये भीती पसरली. त्यामुळे सर्वात पुढे चालणाऱ्या एका कार चालकाने आपल्या वाहनाचा ब्रेक लावला. त्यामुळे इतर वाहने एकमेकांवर आदळली. या घटनेनंतर लगेचच रामजीलाल सुमन यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि नंतर गभाना-बुलंदशहरला रवाना झालेत.

अलीगडच्या खेरेश्वर चौराहा महामार्गावर झालेल्या या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही, परंतु वाहनांचे नुकसान झाले आहे. सपा खासदाराच्या ताफ्यावर टायर फेकण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. शहराचे पोलीस अधीक्षक मृगांक शेखर पाठक म्हणाले की, रामजी लाल सुमन यांच्या ताफ्यावर टायर फेकण्यात आलेत. या संदर्भात गभाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक ती कारवाई केली जाईल.

एसपी म्हणाले की, घटनेनंतर खासदार रामजी लाल सुमन यांना अलीगढच्या पुढे सुरक्षितपणे काढण्यात आले. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही आणि या घटनेनंतर परिसरात शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT