कल्याण सिंह यांच्या निधनावर पंतप्रधानांसह विविध नेत्यांनी व्यक्त केला शोक Saamtv
देश विदेश

कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध नेत्यांनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Krushnarav Sathe

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर देशभरातील विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. जवळपास दोन महिन्यांपासून ते आजारी होते. लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून ते लाईफ सपोर्ट सिस्टम वर होते.

कल्याण सिंह यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना सुरवातीला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना नंतर एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा गोरखपूर दौरा रद्द करून रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यांनतर आज सायंकाळी ९.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. एसजीपीजीआय रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली आहे.

कल्याण सिंह यांचे निधन झाल्याचे समजताच देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "कल्याण सिंह यांचे जनतेशी जिव्हाळ्याचे नाते होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत स्वच्छ राजकारण, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार निर्मूलनचा अत्यंत कारभार केला. त्यांच्या निधनाने देशाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याप्रती माझी मनापासून शोक भावना"

कल्याण सिंह यांच्या मृत्यूची वार्ता कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवरून शोक करत पंतप्रधान म्हणाले कि, कल्याण सिंह यांनी शेतकरी, तरुण व महिलांच्या सशक्तीकरणासाठी मोठे काम केले आहे. येणाऱ्या पिढ्या त्यांचे आभार मानतील. त्यांच्या निधनाने आपल्याला अतीव दुःख झाले आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी देखील कल्याण सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवरून शोक करत योगिनीं म्हटलं आहे कि, "भारतीय राजकारणातील पारदर्शक राजकीय व्यक्तिमत्व तसेच जनसेवेसाठी काम करणारे आणि उत्तम संघटन कौशल्य असलेले लोकप्रिय नेतृत्व आदरणीय कल्याण सिंह जी यांच निधन हे संपूर्ण राष्ट्राचं नुकसान आहे, त्यांना कोटी कोटी नमन "

तसेच भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील कल्याण सिंह यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT