UP Elections Update: प्रियांकांना कालच आला होता पराभवाचा अंदाज... - Saam TV
देश विदेश

UP Elections Update: प्रियांकांना कालच आला होता पराभवाचा अंदाज...

संभाव्य पडझडीचा अंदाज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांना आधीच आल्याचे त्यांनी काल केलेल्या एका ट्वीटवरुन दिसते आहे

साम टिव्ही

नवी दिल्ली : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला जबरदस्त झटका बसला आहे. विशेषतः पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस एका आकड्यावरच राहते आहे या संभाव्य पडझडीचा अंदाज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांना आधीच आल्याचे त्यांनी काल केलेल्या एका ट्वीटवरुन दिसते आहे. (UP Elections Updates Congress Leader Priyanka Gandhi Tweet)

काँग्रेसला (Congress) पंजाबमध्ये मोठी आशा होती. शेतकरी कायद्यांविरोधात झालेल्या आंदोलनाचा फायदा आपल्याला मिळेल, असे काँग्रेसला वाटत होते. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. मात्र, गेल्या काही वर्षांत काँग्रेसने या राज्यात आपला जनाधार गमावला. भाजपने (BJP) केलेला आक्रमक प्रचार, योगी आदित्यनाथांची उभी केलेली प्रतिमा, महिलांच्या सुरक्षेसाठी योगी सरकारने केलेले काम याचा एकत्रित परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी आपले कार्यकर्ते, पक्ष पदाधिकाऱ्यांना उद्देशून ट्वीटर वरुन एक पत्र पाठवले आहे. त्या पत्राचा एकूण सूर हा नकारात्मकच आहे. ''राज्यात दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता नसतानाही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी जो संघर्ष केला त्याबद्दल मला अभिमान आहे," असे म्हणत प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.

मात्र, या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदातून प्रियांका गांधी यांनी पराभव होणार हे मान्य केल्याचे दिसते."जनतेची मते हा लोकशाहीचा आधार आहे. उद्या निवडणुकीचे जे निकाल येतील तो जनतेने आपल्या विवेकबुद्धीने दिलेला कौल असेल. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या जनादेशाचा मान ठेऊन देश आणि प्रदेशाशी निष्ठा ठेवत समर्पणाच्या भावनेतून जनसंघर्ष सुरु ठेवण्याची तयारी ठेवायला हवी," असे प्रियांका गांधी या पत्रात म्हणतात.

जनसंघर्षांचे आवाहन कार्यकर्त्यांना करतानाच "आपली लढाई आता सुरु झाली आहे. आपल्याला ताकदीने व नव्या उर्जेने पुढे जायचे आहे,'' असे प्रियांका यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT