Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये 'आप'चा जलवा; भाजप काँग्रेससह सर्वांचा सुपडा साफ, विजयामागील कारणं काय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली मॉडेल पंजाबच्या जनतेनं स्विकारलं आहे.
Punjab Election Result 2022
Punjab Election Result 2022Saam Tv
Published On

पंजाबमध्ये (Punjab) आम आमदी पक्ष (AAP) काँग्रेसला (Congrss) पिछाडीवर टाकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आपची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. 117 जागांमधील आम आदमी पक्ष आता सर्वात जास्त 89 जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली सह आता आप पंजाब या राज्यातही आता आपचा मुख्यमंत्री असणार आहे. पंजाबमधील अंतर्गत असणारे वाद या निकालांतून दिसून येत आहे.

Punjab Election Result 2022
Arvind Kejriwal : सो जाओ बच्चो वरना केजरीवाल आ जायेगा !';अरविंद केजरीवालांची डायलॉगबाजी

''पंजाबच्या (Punjab) जनतेने भगवंत मान आणि केजरीवाल यांच्या जोडीला सामावून घेतलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Cm Arvind Kejrival)यांचे दिल्ली मॉडेल हे पाच मुख्य कारणांपैकी एक आहे'' अस आप नेते राघव चड्डा यांनी म्हटलं आहे.

पंजाबच्या (Punjab) जनतेने केजरीवाल यांच्या कामाच्या मॉडेलला संधी दिली आहे. बाबासाहेब, भगतसिंग यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. हा मार्ग आता हळूहळू देशभर जाईल, अस आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयामध्ये पाच कारणं आहेत. या पाच करणांमुळे आप ला पंजाबच्या जनतेने स्विकारले आहे. आपची सत्ता येणारं पंजाब दुसर राज्य आहे. पंजाबमार्ग आप आता देशभरात पसणार असल्याचे बोलले जात आहे.

1) दिल्ली मॉडेल

पंजाबच्या (Punjab) निवडणुकांच्या अगोदर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेशी संपर्क साधण्याचा फ्रयत्न केला होता. केजरीवाल यांनी पंजाबमध्ये दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर काम करणार असल्याच आश्वासन दिले. त्यांनी जनतेला त्यांचा अजेंडा समजावून सांगितला. मोफत वीज आणि उत्तम उपचार सुविधांचे आश्वासन दिले.

2) तरुणांचा आणि महिलांचा पाठिंबा

नवं मतदार तरुण आणि महिला मतदारांचा पाठिंबा 'आप'ला मिळाला. केजरीवाल यांनी राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे दिलेले वचन तरुणांना "व्यवस्था बदलण्यासाठी" आणि नवीन राजवटीची सुरुवात करण्यासाठी प्रभावी ठरले. त्यातच केजरीवाल यांनी शिक्षण आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्याची केलेली घोषणा मास्टर स्ट्रोक ठरली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1,000 रुपये जमा करण्याच्या 'आप'च्या (AAP) आश्वासनामुळे त्यांना या वर्गाची पहिली पसंती मिळाली.

3) आश्वासनांनी मतदार झाले आकर्षित

आम आदमी पक्षाने (AAP) निवडणुकी अगोदर अनेक मोठी आश्वासन दिली होती. त्यांनी दिल्लीत केलेलं काम आणि नागरिकांना दिलेल्या सुविधांचा या प्रचारत पुरेपर वापर करुन घेतला.

4) मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान चेहरा

आपने भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर आपवर लागलेला बाहेरतच्या पक्षाचा टॅग गेला. भगवंत मान यांना पारदर्शक पद्धतीने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केल्याने पक्षाची व्होट बँक अधिक मजबूत झाली.

5) शेतकऱ्यांना दिल्लीतून दिले समर्थन

दिल्लीत वर्षभर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या (Farmers) आंदोलनानंतर पंजाबमध्ये मतांची विभागणी झाली. याचवेळी आपने पंजाबच्या (Punjab) राजकारणात उडी घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिलेल्या समर्थनाचा फायदा निवडणुकीत झाला.

इतर चार राज्यात 'आप'ला किती यश?

आम आदमी पक्षाला पंजाब मध्ये चांगले यश मिळाले आहे. पण उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यात आप ला यश मिळालेले नाही.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com