UP Election: अखिलेश म्हणतात भाजपला 'खदेडा होईबे' - Saam TV
देश विदेश

UP Election: अखिलेश म्हणतात भाजपला 'खदेडा होईबे'

ममतादीदीच्या मार्गावर जात उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘खदेडा होईबे’ (आम्ही पिटाळून लावू) हे निवडणूक प्रचारगीत तयार केले आहे

वृत्तसंस्था

लखनौ : पश्‍चिम बंगालच्‍या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात ‘खेला होबे’नारा देत विरोधकांचे ‘पानिपत’ केले. आता ममतादीदीच्या मार्गावर जात उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘खदेडा होईबे’ (आम्ही पिटाळून लावू) हे निवडणूक (Election) प्रचारगीत तयार केले आहे. (UP Elections Akhilesh Yadav new song for elections)

उत्तर प्रदशमधील (UP Elections) पूर्वांचल भागातील स्थानिक भोजपुरी भाषेतील ‘खदेडा होईबे’ हे गीत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर (Socail Media) हे गीत व्हायरल झाले असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. समाजवादी पक्षाच्या (सप) नेतृत्वाखालील आघाडीच्या राजकीय कार्यक्रमातही ते गायले जात आहे.

पक्षाचे विधान परिषदेतील आमदार आशुतोष सिन्हा म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे ‘‘खदेडा होईबे’ करू असे उत्तर प्रदेशमधील जनताच म्हणत आहे. राज्यातील काही ठिकाणी तर त्यांच्या (भाजपच्या) माणसांचा पाठलाग करीत संतप्त मतदार त्यांनी पळवून लावत आहेत. ‘खदेडा होईबे’च्या घोषणेमुळे समाजातील विविध जातींमधील व विविध क्षेत्रांतील लोकांची एकजूट होऊ लागली आहे, असेही ते म्हणाले.

बंगालमधील विधानसभेतील नारा उत्तर प्रदेशमध्ये खूप गाजत आहे आणि योगायोगाची बाब म्हणजे ममता बॅनर्जी यांनी ‘यूपी’तील निवडणुकीत समाजवादी पक्षाला समर्थन दिले आहे. ‘खेला होबे’चे गीतकार व गायक देबांशु भट्टाचार्य यांच्या मते पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील राजकीय स्थिती आणि लढतींचे स्वरूप भिन्न आहे. बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात होता तर ‘यूपी’त सत्ताधारी पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्याचे आव्हान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT