MATHURA IITIAN BABA ARRESTED FOR ALLEGED SEXUAL EXPLOITATION OF YOUNG WOMEN Saam Tv
देश विदेश

Shocking : प्रवचनानंतर प्रसादातून गुंगीचं औषध, अंघोळीचा व्हिडिओ; तरुणींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आयआयटीयन बाबाचा विकृत चेहरा उघड

Uttar Pradesh Mathura Crime News : मथुरेत प्रवचन देण्याच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयआयटीयन बाबा अभिषेक मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • आयआयटीयन बाबाचा धक्कादायक प्रकार

  • भोंदू बाबा अभिषेक मिश्राला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक

  • प्रसादात अंमली पदार्थ देऊन अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा

  • पोलिसांचा पुढील तपास सुरू

Mathura IITIAN Baba Abhishek Mishra Rape Case News उत्तर प्रदेशातील मथुरामधून मोठी बातमी समोर आली आहे. एका आयआयटीयन बाबाने प्रवचन देण्याच्या नावाखाली तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. याप्रकरणी या बाबाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव अभिषेक मिश्रा असे आहे. तो मूळचा ओडिशाचा रहिवाशी आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक मिश्रा काही वर्षांपूर्वी मथुरेतील गोवर्धन परिसरातील राधाकुंड येथे आला होता. तो ऑनलाइन प्रवचन आणि गीतेचे ज्ञान देण्याच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत होता. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे ब्रेनवॉश करत होता. तसेच प्रसाद आणि खाद्यपदार्थांमधून अंमली पदार्थ देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही तपासात समोर आले आहे.

छत्तीसगडमधील एका बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थिनीने (BSC Nursing Student Rape) केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणी १५ मे रोजी बहिणीला भेटण्यासाठी मथुरेला आली होती. बहिण परत गेल्यानंतर आरोपीने तिला प्रसाद म्हणून दूध दिले. "प्रसादाला नाही म्हणायचे नसतं ," असे सांगत त्याने तिला दूध प्यायला भाग पाडलं. दूध प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला शुद्ध आली. त्यावेळी तिची प्रकृती बिघडलेली होती तसेच पोटदुखीचा त्रासही जाणवत होता. १६ मे रोजी भोंदू बाबा पुन्हा पीडितेला भेटण्यासाठी आला. रूममध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिच्याशी घाणेरडं कृत्य केलं आणि कोणाला सांगितल्यास आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी याबाबत कुणालाही माहिती दिली नव्हती. मात्र आरोपीकडून सातत्याने वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन येऊ लागले. तसेच माझ्याकडे आंघोळीचा व्हिडिओ आहे तो व्हायरल करेन अशी धमकी दिल्याचाही आरोप पीडितेने केला आहे.

यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अभिषेक मिश्राला ताब्यात घेतले. त्याच्या ठिकाणाहून आणखी दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या दोघींना नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संगमनेर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

Super El Nino: चिंता वाढली! जगावर 'सुपर एल निनो'चं महासंकट, NASAचा धडकी भरवणारा फोटो; भारतावर काय परिणाम होणार?

Singer Death : संगीतविश्वाला मोठा धक्का; ज्येष्ठ गायिकेचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Sanjay Raut: “२०२९ पर्यंतची गॅरंटी कोण देणार? शिंदे तरी राहतील का?” संजय राऊतांची जोरदार टीका

फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! मेन्टेनन्सची कटकट संपणार; राज्य सरकारचा नवा ऐतिहासिक नियम तयार

SCROLL FOR NEXT