Madhavi Raje Scindia Death  Saam tv
देश विदेश

Madhavi Raje Scindia Death : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक, आई माधवी राजे यांचं निधन; मध्य प्रदेशात पसरली शोककळा

Madhavi Raje Scindia Death news : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे शिंदे यांचं निधन झालं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे शिंदे यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. माधवी राजे यांच्या निधनानंतर मध्य प्रदेशवर शोककळा पसरली आहे. माधवी राजे शिंदे यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

माधवी राजे या गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात न्यूमोनिया आणि सेप्सिस आजारावर उपचार घेत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधी तब्येत बिघडल्यानंतर माधवी राजे यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं. दिल्लीत निधन झाल्यानंतर माधवी राजे यांच्या पार्थिवावर मध्य प्रदेशच्या ग्वालियारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मागील महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे गुना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासहित त्यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे, मुलगा महाआर्यमन शिंदे हे प्रचारादरम्यान दिल्लीत जात होते.

दरम्यान, माधवी राजे या शाही कुटुंबातील होत्या. माधवी राजे यांचे आजोबा नेपाळचे प्रधानमंत्री होते. माधवी राजे या किरण राज्य लक्ष्मी देवी या नावाने देखील ओळखल्या जायच्या. १९६६ साली त्यांच ग्वालियरचे माधवराव शिंदे यांच्याशी विवाह झाला. तत्कालीने काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचा ३० सप्टेंबर २००१ रोजी मैनपुरीजवळ अपघात झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sheikh Hasina: मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

कल्याणमध्ये मध्यरात्री तरूणाची दादागिरी; कोयता घेऊन धिंगाणा, गाड्या अडवून...

Hindu Wedding Rituals: लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी नववधू का तांदळाचं माप का ओलांडते?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ६० आमदारांविरोधात काम केलं, तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Girija Oak in Laws Family: अभिनेत्री गिरिजा ओकचे सासू-सासरे कोण? काय करतात?

SCROLL FOR NEXT