Income tax slab rates
Income tax slab rates  Saam Tv
देश विदेश

New Income Tax Slab : ५ - १० की १५ लाख कमावता? नव्या कररचनेनंतर किती भरावा लागेल टॅक्स? जाणून घ्या!

साम टिव्ही ब्युरो

New Income Tax Slab, Union Budget 2023 : केंद्रातील मोदी सरकारनं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून काय मिळेल, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष असते. बऱ्याच वर्षांनी मोदी सरकारनं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना मोठी भेट देऊ केली आहे. ही नवी कररचना कशी असेल? किती उत्पन्नावर किती कर भरावा लागेल, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात... (Latest Marathi News)

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नव्या प्राप्तिकर कररचनेची घोषणा केली. या नव्या कररचनेत मध्यमवर्गीयाला केंद्रस्थानी ठेवण्यात आलेले आहे. 

आता वार्षिक ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न (Income) असलेल्यांना कोणताही कर (Tax) भरावा लागणार नाही. वैयक्तिक प्राप्तिकरावरील नवे कर दर पुढीलप्रमाणे आहेत. ० ते ३ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 

३ ते ६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के, ६ ते ९ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, ९ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के आणि १२ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के, तर १५ लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांना ३० टक्के कर भरावा लागणार आहे. 

जुन्या टॅक्स स्लॅबचं काय होणार? 

जाणकारांच्या मते, सरकारने उत्पन्नावरील नव्या कररचनेची (New Income Tax Slab) घोषणा केल्यानंतर बऱ्याचशा सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता जुनी कररचना हळूहळू संपुष्टात येईल, असे संकेत यातून देण्यात आले आहेत.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, नवीन करव्यवस्था (Income Tax) अवलंबणाऱ्यांना १५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर फक्त ४५ हजार रुपये कर भरावा लागेल. तर नव्या करव्यवस्थेंतर्गत १५.५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ५२,५०० रुपयांपर्यंत स्टॅंडर्ड डिडक्शन दिला जाईल.

दरम्यान, आतापर्यंत ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही प्राप्तिकर भरावा लागत नव्हता. मात्र, आता ही मर्यादा वाढवून ७ लाखापर्यंत करण्यात आली आहे. नव्या कर व्यवस्थेनुसार, करसवलत मर्यादा ३ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. ती आधी अडीच लाखांपर्यंत होती.

तर आता ६ टॅक्स स्लॅबऐवजी ५ टॅक्स स्लॅब असतील. नवीन करव्यवस्थेत १५.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५२५०० रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन करण्यात आले आहे. ती आधी ५० हजार रुपये इतकी होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghaziabad Fire Update: कुलिंग टॉवर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी

Nashik Robbery : ICICI होम फायनान्सच्या लॉकरवरच डल्ला; ५ कोटींचे दागिने लंपास, CCTV

Ramandeep Singh Catch: लखनऊमध्ये अवतरला 'सुपरमॅन' ; रमनदीपने २१ मीटर मागच्या दिशेने धावत टिपला IPL चा बेस्ट कॅच - Video

Manoj Jarange Patil on Jay Pawar Meeting | जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? दिले स्पष्टीकरण

Sunidhi Chauhan : चाहत्याने पाण्याची बाटली फेकली, तरीही गात राहिली; सुनिधी चौहानने सांगितला लाइव्ह कॉन्सर्टमधील 'तो' किस्सा

SCROLL FOR NEXT