Nirmla Sitharaman Saamtv
देश विदेश

Nirmla Sitharaman: सुख, समृद्धी अन् भरभराट; अर्थमंत्र्यांच्या साडीबद्दल 'या' खास गोष्टी जाणून घ्याच...

अर्थमंत्र्यांच्या लाल साडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

Gangappa Pujari

 Union Budget 2023: केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल.

यावेळी अर्थमंत्र्यांच्या लाल साडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. जाणून घेवूया त्यांच्या या खास साडीबद्दलच्या खास गोष्टी..

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmla Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या कारकिर्दितील हा पाचवा अर्थसंकल्प होता. यावेळी त्यांच्या लाल साडीने सर्वांचेच लक्ष वेधले होते. काळ्या आणि सोनेरी जरीकाठाची ही साडी खूपच खास दिसत होती. त्यामुळे त्यांची ही साडी चर्चेचा विषय ठरली.

साडीचा प्रकार कोणता?

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नेसलेली साडी कांचीपुरम साड्यांपैकी एक आहे. ही साडी रेड टेंपल साडी म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात ही साडी विशेष प्रसिद्ध आहे. या साडीचा उगम हा दक्षिण भारतातील आहे. त्या भागात कांजीवरम किंवा कांचीपुरम या नावांनीही तिला ओळखले जाते. या साडीला प्रचंड मागणी आहे.

लाल रंगाचं वैशिष्ट्य काय?

लाल रंग हा शांती, समृद्धी आणि भरभराटीचं प्रतिक मानले जाते. शक्ती, मजबुती, कणखरपणा आणि सौभाग्यशाली रंग म्हणून ही साडी खास आहे. हिंदू धर्मात लाल रंगाला विशेष महत्व आहे. लग्नात तसेच विविध खास कार्यक्रमांनाही हा रंग शूभ मानला जातो.

कशी बनवली जाते साडी...

या साड्यांच्या विणकामासाठी दक्षिण भारत आणि गुजरातचा जर आणि रेशमी धागे वापरले जातात. अनेक साड्यांसाठी खास ओरिजनल रेशमी धागे वापरले जाता. यामुळे अधिक मऊपणा, चमक आणि टीकाऊपणा वाढतो. या साड्यांमध्ये फुलांच्या डिझाइनसह इतर रंगांचा सुरेख वापर केला जातो. जरीकामासोबतच सुंदर बॉर्डर, पदर आणि ब्लाऊज हेदेखील या साडीचं आकर्षण असतं. यावर सोन्याच्या जरीचा वापर केला जातो. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT