मुंबईहून लखनौला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये आज बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि एकच खळबळ उडाली. तपास यंत्रणांचेही धाबे दणाणले होते. दरम्यान विमान थांबवून कसून तपासणी करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र सीटखाली बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
इंडिगो फ्लाईट क्रमांक 6E 5264 मध्ये मुंबईहून लखनौला जात असताना एका प्रवाशाने अचानक सीटखाली बॉम्ब असल्याचे सांगितले. हे समजताच विमानात गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच त्या विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलून त्याची कसून चौकशी करण्यात आली. मात्र तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर विमानतळ पोलिसांनी त्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०६(२) आणि ५०५(१)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अयुब असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर अफवा पसरवताना पाहिलं असेल. वास्तविक, आजकाल अफवा पसरवणे खूप सोपे झाले आहे. तुम्हाला योग्य आणि योग्य बातम्या मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. पण अफवांचा प्रभाव पडायला वेळ लागत नाही. अशीच काही अफवा मुंबई ते लखनौच्या फ्लाइटमध्ये पसरली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.