Russia-Ukraine Saam tv
देश विदेश

Russia-Ukraine: रशियन सैनिकांना भिडली मर्दानी, सूर्यफुलाच्या बिया देत म्हणाली- खिशात ठेवा, मराल तेव्हा सूर्यफुलं उमलतील

निडर मर्दानीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

वृत्तसंस्था

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये युद्ध होत आहे. त्यामुळे सपूर्ण युक्रेनमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रशियन हल्ल्यापासून वाचण्यासाठी युक्रेनचे नागरिक सबवेचा आधार घेत आहेत. याकाळात युक्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक निडर मर्दानीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. या व्हिडीओमध्ये या महिलेचं शौर्य पाहून अनेकजण चकित झाले आहेत. नेटकरी महिलेच्या शौर्याचे खूप कौतुक करत आहेत (Ukrainian woman confronts Russian soldiers).

ही महिला एका रशियन (Russia) सैनिकाजवळ एकटीच गेली आणि त्याला सूर्यफुलाच्या बिया (sunflower seeds) देऊ लागली. ती सैनिकांना म्हणाली, या बिया तुमच्या खिशात ठेवा, जेणेकरून तुम्ही मराल तेव्हा त्या उमलतील. युक्रेनवर (Ukraine) रशियाने केलेल्या हल्ल्याचा गुरुवारी या महिलेने निषेध केला.

महिलेने शिपायाला सुनावले

व्हिडिओमध्ये महिला 'तू कोण आहेस?' असे म्हणताना ऐकू येते. तेव्हाच सैनिक म्हणतो, 'आम्हाला इथे सराव करावा लागेल. प्लीज इथून निघून जा.’ ती त्याला म्हणाली, ‘कसला सराव? तू रशियन आहेस?’ त्यावर सैनिकाने ‘हो’ असं उत्तर दिलं. यावर ती महिला चिडते आणि म्हणते, 'मग तू इथे काय करतो आहेस? तुम्ही आक्रमक आहात, फॅसिस्ट आहात! एवढ्या बंदुका घेऊन तुम्ही आमच्या भूमीवर काय करत आहात? या बिया तुमच्याजवळ ठेवा आणि खिशात ठेवा, म्हणजे किमान तुम्ही जेव्हा युक्रेनच्या भूमीवर मराल तेव्हा सूर्यफूल (युक्रेनचे राष्ट्रीय फूल) उमलू शकेल.'

यावर शिपाई म्हणतो, 'आता आमच्यासोबत बोलल्याने काहीही होणार नाही. कृपया परिस्थिती वाढवू नका'. यानंतर ती महिला म्हणाली, 'तू माझ्या जमिनीवर आला आहेस. समजलं का? तुम्ही आक्रमणकर्ते आहात तूम्ही शत्रू आहात.' यावरही रशियन सैनिक 'होय' असे उत्तर देतो.

महिलेच्या शौर्याचे कौतुक

कीव्हमधील स्वतंत्र मीडिया चॅरिटी संस्था इंटरन्यूज युक्रेनने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तेव्हापासून लाखो लोकांनी सोशल मीडियावर या व्हिडीओ पाहिला आहे. तसेच, नेटकऱ्यांकडून य महिलेची खूप प्रशंसा करण्यात येत आहे. तसेच, पुतिनसाठी हा इशारा असण्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT