वृत्तसंस्था: युक्रेन- रशिया (Ukraine-Russia) यांचा वाद आणखी चिघळल्यावर भारत सरकारने (Indian government) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेकरिता मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी एअर इंडियाचे (Air India) विमान AI१९४६ ने कीव येथून उड्डाण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान रात्री ११.४५ च्या सुमारास दिल्ली येथे पोहोचले आहे. या विमानामधून युक्रेनमध्ये (Ukraine) राहणाऱ्या २४२ भारतीयांना आणण्यात आले आहे. एअर इंडियाच्या विमानाने (Air India flight) भारतात (India) पोहोचलेल्या लोकांचे स्वागत करण्याकरिता त्यांचे नातेवाईक अगोदरच विमानतळावर पोहोचले होते.
एअर इंडियाचे युक्रेनला जाणारे पहिले विमान आज सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास उड्डाण केले आहे. यामध्ये २४२ लोकांना पूर्ण क्षमतेने आणण्यात आले आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानामधून भारतीय लोकांना (people) युक्रेनमधून आणण्यात आले आहे. २४ आणि २६ फेब्रुवारीला देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना मायदेशी आणण्याकरिता एअर इंडियाची विमाने उड्डाण करणार आहेत. एअर इंडियाने या अगोदर कधी देखील युक्रेनला उड्डाण केले नव्हते. मात्र, संकटात सापडलेल्या भारतीयांना वाचवण्याकरिता सरकारने एअर इंडियाची उड्डाणे तेथे जाऊन भारतीय नागरिकांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील पहा-
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार की, पुढील आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी २५६ बोईंग ७८७ ड्रीमलाइनर उड्डाण भारतामधून युक्रेनला पाठवली जाणार आहेत. युक्रेनमधून भारतात येणारे नागरिक एअर इंडियाचे बुकिंग ऑफिस, वेबसाइट, कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सद्वारे बुकिंग सुरू करू शकणार आहेत. दरम्यान दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून भारतात परतणारे विमान महागले आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. युक्रेनमध्ये असलेल्या बिहारी (Bihar) विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतायचे आहे, पण आता विमान तिकिटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ज्यांना तिकीट मिळत आहे. त्यांना देखील जास्त किंमत मोजावी लागत आहे.
विद्यार्थी अनेक एजंटांच्या संपर्कात आहेत. इकडे मीडियामध्ये युद्धाच्या बातम्या येत असल्यामुळे कुटुंबातील तणाव प्रत्येक क्षणी वाढत आहे. युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय नागरिक आहेत. भारत सरकारने सर्व नागरिकांना लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहन केले आहे. आलेल्या २४२ विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी मेडिकल शिकण्याकरिता युक्रेनला गेले आहेत. युक्रेनमधून मायदेशी परतल्यावर अनेक विद्यार्थ्यांना भारतात नवीन आयुष्य मिळाल्याचे वाटत आहे. पुढील काळात युक्रेनमधील परिस्थिती खूपच वाईट होणार आहे. पश्चिम युक्रेनमध्ये राहत असलेले नागरिक हे पश्चिम युक्रेनमधील परिस्थिती पूर्व युक्रेनसारखी वाईट नाही. रशियाचे सैन्य जवळपास सर्व सीमेवर तैनात आहे.
सीमेवर मोठ्या प्रमाणात रशियन शस्त्रे आणि युद्ध रणगाडे ठेवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री गोळीबाराचा आवाज येत असे, जे ऐकून ती घाबराहटाचे वातावरण तयार झाले आहे. युक्रेनमध्ये सर्वत्र पोलीस गस्त घालत असल्याची माहिती मिळाली आहे. दिवस- रात्र पोलिसांची गस्त सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचा तेथील नागरिक संगत आहे. भारतात आल्यावर त्यांना खूप सुरक्षित वाटत आहे आणि आता त्यांना दुसरे आयुष्य मिळाल्याचे त्यांना वाटत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.