Russia-Ukraine War  Saam Tv News
देश विदेश

Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर विध्वसंक हल्ला, ५०० क्षेपणास्त्रांनी युक्रेन हादरलं; पायलटसह ७ जण जागीच ठार

Russia-Ukraine War : रशियाच्या सर्वात मोठ्या हवाई हल्ल्यात युक्रेनचे लढाऊ विमान उद्ध्वस्त झालयं. पायलटसह 7 जण जागीच ठार झालेत. त्यामुळे एकीकडे शांततेची चर्चा सुरु असताना दुसरीकडे ड्रोन युद्धाचा थरार नेमका कसा होता? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

तीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात रशियानं युक्रेनवर महाभंयकर असा हवाई हल्ला केलाय. युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जातोय. रशियाने एकाच रात्रीत युक्रेनच्या पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 477 ड्रोन आणि 60 क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्यामुळे रशियाचा युक्रेनवरील हा विध्वसंक हल्ला असल्याची माहिती खुद्द हवाई दल प्रमुखांनी दिलाय.

युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. त्यावेळी युक्रेनियन पायलटच्या शौर्याला देशभरातून सलाम केला जातोय. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूचा हल्ला थांबवला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य लोकांची सुरक्षा केली.

युरी इहनाट, हवाई दल संपर्कप्रमुख, युक्रेन

युक्रेनने यावेळी रशियाचे 249 ड्रोन हल्ले परतवून लावले. तर 226 ड्रोन आकाशात उद्धवस्त करून टाकले. मात्र या ड्रोन हल्ल्यावेळी युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालयं. 7 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. रशियानं युक्रेनचं F-16 लढाऊ विमान उद्धवस्त केलयं.

लढाऊ विमान उद्धवस्त

युक्रेनकडे मर्यादित F-16 लढाऊ विमानं

2024 मध्ये नेदरलँड्स आणि डेन्मार्ककडून F-16 विमानाची खरेदी

रशिया- युक्रेन युद्धात तिसऱ्यांदा F-16 विमान उद्धवस्त

रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये नव्याने अस्थैर्य पसरले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर शेजारचे पोलंड आणि इतर मित्र देश सतर्क झाले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्तंबूलमध्ये शांततेची तयारी दर्शवल्यानंतर हा हल्ला झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. रशियाच्या या मोठ्या हल्ल्यानंतर शांततेची शक्यता आणखी धुसर झाली आहे. त्यामुळे चौथ्या वर्षात तरी युद्ध थांबणार की रशियाच्या या मोठ्या हल्ल्यानंतर आणखी भडकणार याकडे जगाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाण्याच्या वर्चस्वावरुन महायुतीत मतभेद, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात पुन्हा संघर्ष

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार; मुंबईत मनसेचे बॅनर झळकले

Irfan Pathan : कुत्र्याचं मांस खाल्ल असल्याने...; विमानात इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीमध्ये राडा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

SCROLL FOR NEXT