Ujjain Viral Video Saam tv
देश विदेश

Ujjain Viral Video: तरुण धावत्या ट्रेनमधून खाली पडला, अंगावरून दोन डब्बे गेले अन्...; हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उज्जैनला असलेल्या यात्रेमध्ये महादेवाचे दर्शन घेऊन हा तरुण एक्सप्रेस ट्रेनने घरी निघाला होता.

Ruchika Jadhav

Train Accident : देवाच्या दारात गेल्यावर देव आपल्याला अधीच निराश करत नाही असं अनेकदा म्हणतात. अशात देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती घडवून देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक तरुण चालत्या ट्रेनमधून खाली पडतो. त्याच्या अंगावारून संपूर्ण ट्रेन जाते. मात्र या घटनेत त्या व्यक्तीला खरचटत देखील नाही. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Accident)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मिथून मालवा हा तरुण उज्जैन येथून आपल्या घरी शाजापूर येथे निघाला होता. उज्जैनला असलेल्या यात्रेमध्ये महादेवाचे दर्शन घेऊन हा तरुण एक्सप्रेस ट्रेनने घरी निघाला होता. मात्र घरी जात असताना वाटेत त्याचा मोठा अपघात होतो. या अपघाताचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण चालती ट्रेन पकडण्याचे धाडस करतो. जेव्हा तो स्टेशनवर पोहतो तेव्हा ट्रेन सुटलेली असते. त्यामुळे तरुण धावती ट्रेन पकडतो. मात्र यामध्ये त्याचा तोल जातो आणि तो ट्रेन खाली पडतो. ट्रेनखाली पडल्यानंतर लगेचच काही प्रवाशी ट्रेनची साखळी खेचतात. सदर घटना घडते त्यावेळी ट्रेनमध्ये मोठी गर्दी असल्याचे दिसत आहे.

ट्रेन खाली पडल्यानंतर या तरुणाच्या अंगावरून ट्रेनचे शेवटचे दोन डब्बे जातात. मात्र तरी देखील या तरुणाला कोणतीही दुखापत होत नाही. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तेथील आरपीएफ जवानांनी सतर्कता दाखवत तेथे धाव घेतली.

वाचवायला गेला अन् स्वत:च खाली पडला

जेव्हा मिथून हा तारुण ट्रेनच्या खाली पडतो तेव्हा त्याला वाचवण्यासाठी एक जण प्रयत्न करत असतो. या प्रयत्नामध्ये हा तरुण देखील ट्रेनच्या खाली जाण्याच्या बेतात असतो. तो ट्रेन आणि फलाट या दोघांमधील अंतरात अडकतो. इतर प्रवाशी हे पाहून त्याला लगेचच वर खेचतात आणि यामध्ये त्याचा देखील जीव वाचला आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी हा व्हिडिओ काळजात धडकी भरवणाराच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT