Ujjain Crime saam Tv
देश विदेश

Ujjain Crime: घरच्यांशी वाद झाल्यानंतर उज्जैनाला होती अल्पवयीन पीडिता; तीन ऑटोमध्ये झाला अतिप्रसंग, ५ जणांना अटक

Ujjain Crime: उज्जैनमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.

Bharat Jadhav

Ujjain Crime:

उज्जैनमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांमध्ये मुख्य आरोपीचाही समावेश आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा दावाही पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. (Latest Crime News)

पीडिता सतना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळालीय. दरम्यान तपासासाठी पोलिसांचे पथक सतना येथे पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण लवकरच उघड होईल, असा दावा उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी केलाय. दरम्यान, अत्याचाराच्या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थिनीला उपचारासाठी इंदूरला पाठवण्यात आलंय. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थिनीचे मेडिकल बुलेटिनही घेतले जात आहे.

उज्जैनमध्ये २५ सप्टेंबर रोजी एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी लोकांकडून तक्रार आल्यानंतर महाकाळ पोलिसांनी विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले, त्यानंतर महाकाळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवलाय. यासंदर्भात उज्जैनचे पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली. विद्यार्थिनीची ओळख पटलीय.

ही पीडिता मूळची सतना येथील आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी सतना येथे अपहरणाची तक्रारही दाखल केली होती. दरम्यान २४ सप्टेंबरपासून ती घरातून बेपत्ता होती. पोलिसांनी माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी अत्याचार प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन रिक्षाचालक आहेत. पोलीस यांची चौकशी करत आहेत. या संशयितांमध्ये एक मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

घरच्यांशी वाद झाल्यानंतर पीडिता विद्यार्थिनी रागाच्या भरात रेल्वेत बसून उज्जैनला पोहचली होती. तेथे देवास गेट बसस्थानकाच्या बाहेर रात्री ऑटोचालकानं त्याला त्याच्या ऑटोमध्ये बसवलं. यानंतर त्या विद्यार्थिनीने एकामागून एक तीन ऑटो बदलले. याच काळात तिच्यावर अत्याचार झाला. विद्यार्थिनीचे ऑटोमध्ये ये-जा करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. जेव्हा तिच्या कुटुंबियांनी सतना येथे तक्रार दाखल केली तेव्हा त्यांनी असेही सांगितले होते की, विद्यार्थिनी तिच्या गावाचे नाव सांगू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar 2025: पहिल्याच श्रावणी सोमवारी बनलेत 4 दुर्मिळ योग; 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Office Snacks Recipe : ऑफिसमधल्या छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, आताच ट्राय करा 'हा' पदार्थ

घराच्या कोपऱ्यात लपलेला तब्बल १२ फूट अजगर; व्हिडिओ पाहून शहारे येतील

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT