मध्यप्रदेशातील उज्जैनमधून एक संतापजनक घटना समोर आलीय. एका १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उज्जैन जिल्ह्यात घडलीय. अत्याचार झाल्यानंतर पीडिता मदतीसाठी अर्धनग्न अवस्थेत दरोदार फिरत होती, परंतु पीडितेच्या मदतीला कोणीच धावले नाही. पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मध्यप्रदेशातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. (Latest Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बडनगर रोडवरील दांडी आश्रमाजवळ सोमवारी संध्याकाळी ही पीडिता जखमी अवस्थेत सापडली. पीडितेचे कपडे फाटलेले होते आणि ती रक्तबंबाळ अवस्थेत होती, अशा अवस्थेत कुठे जावं हे पीडितेला कळत नव्हतं. पीडिता संवरखेडी सिंहस्थ बायपास जवळील घरात घरांमध्ये ती मदत मागत होती.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडिता मदत मागताना दिसत आहे, परंतु लोक तिला पळवून लावताना दिसत आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत असलेली पीडिता मदतीसाठी तब्बल ८ किलोमीटर पाय चालत गेल्याचं सांगितलं जात आहे. आठ किलोमीटर चालल्यानंतर एका आश्रममधील एका पुजाऱ्याने तिला मदत केली. पुजाऱ्यानं पीडितेला पाहताच तिला टॉवेल दिला आणि जिल्हा रुग्णलयात दाखल केलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला इंदूर रुग्णालयात नेण्यात आले आहे. पीडितेचं खूप रक्त वाहिल्यामुळे तिला रक्त चढवण्यात आलं.
दरम्यान पोलिसांनी पीडितेला काय झालं याची विचारणा केली. परंतु तिला काही सांगता आले नाही. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले असून पास्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उज्जैन पोलीस निरीक्षक सचिन शर्मा यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या उच्चारावरुन ती उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमधील असल्याची शक्यता आहे. दरम्यान पीडितेनं कोणताच तपशील दिला नाही.
तसेच तिच्या आईसोबत काहीतरी वाईट झाल्याचं तिनं सांगितलं. दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनीही या घटनेबाबत X (ट्विटर) वर पोस्ट केली आहे. "उज्जैनमध्ये एका लहान मुलीवर अत्यंत क्रूर अत्याचाराचे प्रकरण पाहणे हृदय पिळवटून टाकणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मध्यप्रदेश राज्य मुलींसाठी असुरक्षित झालं आहे. येथील राज्य सरकारला मुलींची सुरक्षा फक्त जाहीरातबाजीसाठी आहे, असं कमलनाथ यांनी दुसऱ्या एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.