Sharing Fake AI War Videos During Iran–Israel Conflict Saam Tv
देश विदेश

AI व्हिडीओ शेअर केले अन् अडकले, १९ भारतीयांना अटक करा, UAE सरकारचा आदेश

UAE Arrest 19 Indians : इराण-इस्त्राइल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआयद्वारे तयार केलेले बनावट युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी यूएई सरकारने ३५ जणांवर कठोर कारवाई केली आहे.

Namdeo Kumbhar

UAE arrests Indians for sharing fake AI videos during Iran Israel conflict : इराण-इस्त्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आखाती देशातील अनेक देशांना बसत आहे. इराणकडून यूएईवरही क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आला. त्यामुळे तेथील परिस्थिती तणावाची आहे. त्यातच काही जणांकडून एआयचे व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील वातावरण आणखी चिघळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एआयच्या व्हिडिओविरोधात यूएई सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. एआयचे व्हिडिओ काढून प्रसारित करणाऱ्यांविरोधात आर्थिक दंड आणि अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात यूएईमधील १९ भारतीय अडकल्याचे समोर आले आहे.

UAE मध्ये १९ भारतीयांना अटक करण्याचे आदेश यूएई सरकारकडून देण्यात आले आहेत.युद्धाचे AI व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई कऱण्यात आलीय. ‘दिशाभूल करणारे आणि बनावट आशय असलेले व्हिडिओ क्लिप’ प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहेत. इराण युद्धादरम्यान दिशाभूल करणाऱ्या पोस्टबद्दल संयुक्त अरब अमिरातीने (UAE) १९ भारतीयांसह ३५ जणांवर आज कडक कारवाई केली आहे. या कंटेंटला दिशाभूल करणारे आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. यूएई सरकारने ३५ जणांना अटक करण्याचे थेट आदेश दिलेत.

एआयचे व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कोर्टात खटला चालवला जाईल, असे यूएईच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ३५ व्यक्तींवर सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ पोस्ट करून दहशत आणि भीती निर्माण केल्याचा आरोप आहे. अटक केलेल्या व्यक्तींना किमान १ वर्षाची शिक्षा आणि किमान १,००,००० दिरहम (24,76,738 भारतीय रूपयात) दंड होऊ शकतो. दरम्यान, युएईच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यूएईमध्ये ३५ जणांविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १९ भारतीयांचा समावेश आहे. त्याशिवाय पाकिस्तानी, नेपाळी आणि बांगलादेशच्या लोकांचाही यात समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा राजीनामा

Maharashtra News Live Update: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

SCROLL FOR NEXT