Bird Flu Saam tv
देश विदेश

Bird Flu : २ वर्षाच्या मुलीनं खाल्लं कच्चं मांस, बर्ड फ्लूमुळे मृत्यू, राज्यात अलर्ट

Bird Flu : आंध्र प्रदेशमध्ये बर्ड फ्लूमुळे दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. कच्चं मांस खाल्ल्यामुळे बर्ड फ्लूची लागण केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. राज्यात अलर्ट जारी करण्यात आलेय.

Namdeo Kumbhar

Death of two-year-old in Andhra linked to bird flu : दोन वर्षाच्या मुलीचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. मृत मुलीने कोंबडीचे कच्चं मांस खाल्ल्याने H5N1 बर्ड फ्लूची लागण झाली होती. उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये खळबळ माजली. राज्यभर अलर्ट जारी करण्यात आलाय.

मानवी बर्ड फ्लू प्रकाराची आंध्र प्रदेशमधील पहिलीच घटना आहे. दोन वर्षाची मृत मुलगी पलनाडू जिल्ह्यातील नरसोपेट येथील बलिया नगरमध्ये राहत होती. १६ मार्च रोजी AIIMS-मंगलगिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु तिथे तिचा मृत्यू झाला.

२८ फेब्रुवारी रोजी २ वर्षाच्या मुलीला अचानक ताप येऊ लागला. हळूहळू तिची प्रकृती खालावत चालली. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबियांनी ४ मार्च रोजी तिला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट प्रकृती आणखी बिघडल्याने मेट्रो शहरातील रुग्णालयात हलवण्यात आले.

२ वर्षांच्या मुलीच्या नमुन्यांची चाचणी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवण्यात आली. २४ मार्च रोजी मुलीला बर्ड फ्लू झाल्याचे समोर आलेय. दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही याला दुजोरा दिला आहे.

२ वर्षाच्या मुलीने २६ फेब्रुवारी रोजी कच्चे चिकन खाल्ले होते. हेच कच्चे चिकन चिमुकलीच्या मृत्यूचे कारण ठरले. या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रीय संयुक्त प्रादुर्भाव प्रतिसाद पथक पाठवले आहे. आंध्र प्रदेश सरकारने राज्य सरकारने पोल्ट्री फार्म्सची तपासणी केली, परंतु तिथे बर्ड फ्लूचे कोणतेही लक्षण आढळले नाही.

आंध्र प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत भारतात H5N1 आणि H9N2 या बर्ड फ्लूच्या केवळ पाच घटना नोंदवल्या गेल्या. याआधी २०२१ मध्ये हरियाणातील गुरुग्राम येथे एका ११ वर्षांच्या मुलाचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, H5N1 चा मानव-ते-मानव प्रसारित होणारा आजार आहे. खबरदारी म्हणून सार्वजनिक आरोग्य उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT