Crime news  Saam Tv file pic
देश विदेश

Two wife fight for husband : दोन बायका आणि फजिती ऐका! दोन महिलांचा एकाच व्यक्तीवर दावा, काय आहे नेमकं प्रकरण?

two wife fight for husband in police station : दोन बायका आणि फजिती ऐका, असंच एक प्रकरण समोर आलं आहगे. दोन राज्यातील महिलांचा एकाच व्यक्तीवर पती म्हणून दावा केला. त्यानंतर या दोन महिलांचा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : बिहारमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. दोन राज्यातील दोन महिलांनी एकाच व्यक्तीवर दावा केला आहे. दोन्ही महिला एका व्यक्तींसाठी भांडू लागल्याने वाद थेट पोलीस स्टेशनला पोहोचला. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून हे अजब प्रकरण समोर आलं आहे. दोन पत्नींचा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याने पोलीसही चक्रावून गेले.

काय आहे प्रकरण?

बिहारमधील परवलपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन महिला पोहोचल्या. या दोन्ही महिलांनी पोलिसांत एकाच पतीवर दावा केला. एक महिला ही उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात राहणारी आहे. तर दुसरी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहे. दोन राज्यातील महिलांनी एकाच व्यक्तीवर पती म्हणून दावा केल्याने पोलीसही चक्रावून गेले.

काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्टनुसार, नालंदाच्या मई गावात राहणारे उमेश पालचं पहिलं लग्न उत्तर प्रदेशच्या इटावा येथे राहणाऱ्या उषासोबत झालं. पहिली पत्नी उषाला दोन मुले आहेत. सासरच्या मंडळीचा त्रासाला कंटाळून पहिली पत्नी ही मागील ५ वर्षांपासून माहेरी राहतेय. यामुळे उमेशने दुसऱ्या महिलेसोबात लग्न केलं. दुसऱ्या पत्नीचं नाव प्रमिला आहे. प्नमिलाला पहिल्या नवऱ्याने सोडलं आहे. तर उमेश हा प्रमिलाचा दुसरा पती आहे.

प्रमिलाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'पहिल्या पतीपासून काहीच घेत नव्हती. मी स्वत: मेहनत करून स्वत:चा खर्च भागवत होते. आता उमेशसोबत लग्न केले. मागील दीड वर्षांपासून उमेशसोबत राहत आहे'.

'आता उषा म्हणत आहे की, मी माझ्या पतीला घेऊन जाणार आहे. पण मी माझ्या पतीला तिच्यासोबत जाऊन देणार नाही. मागील पाच वर्षात तिला मुले आणि पतीला का शोधलं नाही, असा सवाल प्रमिलाने केला.

उषाने म्हटलं की, 'मी इटावा येथे राहत होती. उमेशने माझ्यासोबत लग्न केला आहे. पण तो मला मारहाण करायचा. त्यामुळे मी वेगळी राहत होती. परंतु माझ्या पतीने दुसऱ्या महिलेशी कोर्ट मॅरेज केलं आहे. मला आता वाटतंय की, माझा पती आणि मुलांनी सोबत राहावं'.

पतीचं काय म्हणणं?

उमेश पालने सांगितलं की, 'उषासोबत पहिलं लग्न झालं होतं. परंतु उषा ही दुसऱ्या मुलासोबत निघून गेली. जाताना तिने सोन्याचे दागिनेही घेऊन गेली आहे. त्यामुळे माझी संपूर्ण अब्रु गेली. आता मी प्रमिलासोबत राहू इच्छित आहे'. दरम्यान, पतीने असं म्हटल्यानंतर उषा तिथून निघून गेली, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT