दोन राजकीय हत्यांनी केरळ हादरले; भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन यांची हत्या Saam Tv
देश विदेश

दोन राजकीय हत्यांनी केरळ हादरले; भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन यांची हत्या

भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन यांची घरात घुसून हत्या करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन यांची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. १२ तासांमध्ये झालेल्या २ राजकीय हत्यांमुळे (killing) केरळ मधील राजकारण (Politics) चांगलेच भडकले आहे. या २ हत्यांमुळे केरळ (Kerala) मधील अलप्पुझा जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी (CM) देखील या घटनेची निंदा केली आहे. अलप्पुझामध्ये रविवारी सकाळी भाजपा (BJP) नेत्याची हत्या करण्यात आली.

हे देखील पहा-

हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रंजित श्रीनिवासन असे असून, ते भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सचिव होते. आज सकाळच्या सुमारास काही लोक त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्यांची हत्या करण्यात आली आहे. १२ तासांच्या आत २ नेत्यांची हत्या झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) अलाप्पुझामध्ये २ दिवसांसाठी कलम १४४ लागू करण्यात आली आहे. तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी या २ नेत्यांच्या झालेल्या हत्येचा घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी पोलिसांवर (police) हल्ला करणाऱ्यां विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

केरळ मधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सचिव के.एस. शान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना उपचाराकरिता कोची (Kochi) येथे पाठविण्यात आले आहे. मात्र, उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. एसडीपीआय नेत्याच्या हल्ल्यानंतर पक्षाध्यक्ष आणि एम.के. फैजी यांनी या प्रकरणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला आहे. के.एस. शान हे दुचाकीवरून घरी जात असताना एका कारने त्यांना धडक दिली आहे.

त्यानंतर के.एस. शान हे रस्त्यावर पडले. मग कारमधील काही लोकांनी त्यांची हत्या केली आहे. गंभीर जखमी झालेल्या शान यांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर ४० पेक्षा जास्त वार दिसून आले आहेत. या घटनेनंतर रविवारी सकाळी भाजपाच्या एका नेत्याची हत्या झाली आहे. आता या घटनेमुळे केरळमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

West Bengal Result: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव का झाला? कोणत्या 5 कारणांमुळे भाजपचं कमळ फुललं?

Election Result Live : आसाममध्ये भाजपचं शतक, 100 जागांवर आघाडी

Akshay Kardile: राहुरीत पुन्हा कर्डिले पॅटर्न! शरद पवारांच्या उमेदवाराचा १ लाख मतांनी पराभव; वडिलांच्या आठवणीत अक्षय झाले भावुक

डाव्यांचा शेवटचा गड ढासळला; केरळच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा, भाजपला किती जागा मिळाल्या?

Trisha Krishnan: थलापती विजयची सत्ता; निवडणुकीचे आकडे येताच अभिनेत्री त्रिशा पोहचली भेटायला, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT