धक्कादायक: सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पावित्र्य भंग झाल्याने...

पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये जमावाच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली
धक्कादायक: सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पावित्र्य भंग झाल्याने...
धक्कादायक: सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पावित्र्य भंग झाल्याने...Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये जमावाच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाने रेलिंगवरून उडी घेत गुरु ग्रंथ साहिब (Guru Granth Sahib) येथील पावित्र्य भंग करणारी कृती केल्यानंतर सुवर्ण मंदिरातील (Golden Temple) उपस्थितांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

अमृतसरचे (Amritsar) पोलीस उपायुक्त परमिंदरसिंग भंडाल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण मंदिरामध्ये सायंकाळी "रेहरास साहिब" (Rehras Sahib) पाठ सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक अज्ञात व्यक्ती अचानक रेलिंगवरून उडी मारून गाभाऱ्यात आला आणि त्याने गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवण्यात आलेली तलवार (Sword) उचलण्याचा प्रयत्न केला होता.

हे देखील पहा-

त्याचवेळी या व्यक्तीला तिथे उपस्थित शीरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी सदस्यांनी पकडले आणि बाहेर नेले होते. तिथे जमावाने त्याला बेदम मारहाण केली असता त्यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टेमकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (hospital) पाठवण्यात आला आहे. तो एकटाच सुवर्णमंदिरामध्ये आला होता, असे प्रथमदर्शनी दिसत असून तरुणाची ओळख पटवणारे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नाही.

धक्कादायक: सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पावित्र्य भंग झाल्याने...
दगडूशेठ दर्शनानंतर अमित शहा देणार NDRF कॅम्पला भेट; कडक पोलीस बंदोबस्त

पोलीस याघटनेविषयी अधिक चौकशी करत आहेत. शीरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे कार्यकारी सदस्य भाई गुरप्रीतसिंह रंधावा यांनी, श्री अमृतसर साहिब येथे घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले आहे. या घटनेची तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पंजाब (Punjab) सरकारकडे केली आहे. भाजप (BJP) नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी देखील या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

दरबार साहिब येथील पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही दु:खद घटना आहे. याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी माझी चर्चा झाली असून याप्रकरणी योग्यती कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सिरसा यांनी यावेळी सांगितले आहे. गृहमंत्री याविषयी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी (CM) बोलणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com