देश विदेश

VIDEO: दोन विमानांची आकाशात एकमेकांना धडक, दोन्ही वैमानिकांचा मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडीओ

विमान दुर्घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता घडल्याची माहिती मिळत आहे. आकाशात साहसी प्रात्यक्षिके करताना हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : विमान अपघातांचे (Airplane Crashed Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडिया उपलब्ध आहेत. मात्र क्वचितच दोन विमानांची धडक झाल्याचे व्हिडीओ तुम्हाला दिसतील. जर्मनीमध्ये दोन विमानांची धडक झाल्याची घटना समोर आली आहे. उंच आकाशात उडणाऱ्या या विमानांच्या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. थरकाप उडवणारा हा संपूर्ण अपघाताचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विमान दुर्घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता घडल्याची माहिती मिळत आहे. आकाशात साहसी प्रात्यक्षिके करताना हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे. दोन्ही विमान एकामागे एक उड्डाण करताना दिसत आहेत. अचानक एक विमान खाली येतं आणि पुन्हा वर जातं आणि मागील विमानाला धडक देतं. धडक झाल्यानंतर दोन्ही विमानं एकमेकांमध्ये अडकली.

या अपघातात दोन्ही विमानाच्या वैमानिकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. वेगाने दोन्ही विमानं जमिनीवर पडली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृष्यानुसार दोन्ही विमानं दूर झाडांमागे पडली. त्यानंतर काही सेकंदात हळूहळू धूर वर आकाशात दिसू लागला.

अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्यांनी टक्कर झाल्यानंतर दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. दोन्ही वैमानिक मिरर फ्लाइटसाठी प्रशिक्षण घेत होते. अशावेळी विमाने एकमेकांना समांतर उडतात. या दोन्ही वैमानिकांनी 2019 मध्ये व्हिंटेज एरोबॅटिक्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपदही पटकावले होते.

'द सन' या ब्रिटीश वृत्तपत्राशी बोलताना विमान वाहतूक तज्ज्ञ अँड्रियास स्पेथ यांनी सांगितले की, दोन्ही वैमानिक त्यांच्या विमानासोबत एरोबॅटिक्सचे एकत्र प्रशिक्षण घेत होते, असे दिसते. दोन्ही विमाने अडकली आणि नंतर ते एकत्र क्रॅश झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT