Goods Trains Collide In West Bengal Saam Tv
देश विदेश

Goods Trains Collide In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, 12 डबे रुळावरून घसरले (पाहा व्हिडिओ)

अपघात इतका भयंकर की…

Shivani Tichkule

West Bengal Train Accident: ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे हा रेल्वे अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या एका मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली, त्यामुळे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. या घटनेत मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरा येथे आज पहाटे ४ वाजता ही घटना घडली. सूत्रांनी सांगितले की, एक मालगाडी ओंडा स्थानकावरून जात असताना मागून येणार दुसऱ्या मालगाडीने जबर धडक दिली. त्यामुळे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मालगाड्या रिकाम्या होत्या. अपघाताचे नेमके कारण काय आणि दोन्ही गाड्यांची धडक कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे आद्रा विभागात अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. (Train Accident)

या रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ट्रेनचं इंजिन ट्रॅकच्या बाहेर गेल्याचं दिसत आहे.मालगाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मदत कार्यास सुरुवात केली आहे. तसेच रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT