Tragic Train Collision in Jharkhand's Berhait: Two Dead, Four Injured @airnews_ranchi
देश विदेश

Train Collision : दोन मालगाड्या एकाच ट्रॅकवर, जोरदार धडक, भीषण अपघातात इंजिनाचा चक्काचूर

Jharkhand Train Accident: झारखंडमधील बरहेटमध्ये दोन मालगाड्याची जोरदार धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर चार जण जखमी आहेत.

Namdeo Kumbhar

Train Collision in Berhait Jharkhand : झारखंडमध्ये बरहेटमध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. बरहेटमध्ये एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या समोरासमोर आल्यामुळे जोरदार धकड झाली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमीवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

फरक्का येथून ललमटियाकडे एक मालगाडी निघाली होती. ही मालगाडी बरहेट येथे थांबलेल्या मालगाडीला जोरदार धडकली. ही धडक इतकी भयानक होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनाचा चक्काचूर झाला. मालगाडीला आगही लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मालगाड्या कोळसा वाहून नेहत होत्या. त्यावेळी एकाच ट्रॅकवर आल्यामुळे जोरदार धडक झाली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय.

रेल्वे अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले. बचावकार्य तात्काळ सुरू झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातामध्ये दोन्ही लोको पायटलचा दुर्देवी मृत्यू झालाय. मृतदेह रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात जखमी झालेले चार जण रेल्वे कर्मचारी आमि सीआयएसएफ जवान असल्याचे समोर आले आहे. अपघातामधील जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वेकडून प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

मंगळवारी पहाटे ३:३० च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर मालगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातामुळे रेल्वे मार्ग बंद झाला आहे. दुरूस्तीसाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात, असे समजतेय. सध्या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रेल्वे विभाग या अपघाताची चौकशी सुरू आहे. दोन गाड्या एकाच रुळावर कशा आल्या? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT