Manasvi Choudhary
स्लिव्हलेस ब्लाऊज फॅशनमध्ये सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. मुलीसह अनेक महिला आजकाल स्लिव्हलेज ब्लाऊजचा ट्रेंड फॉलो करतात.
स्लिव्हलेस ब्लाऊजचे अनेक पॅटर्न्स आहेत. तुम्ही सिंपल ते मॉडर्न या लूकमध्ये खास ब्लाऊजची स्टाईल करू शकता.
स्लिव्हलेस ब्लाऊज पॅटर्नमध्ये डीप व्हि नेक हा ट्रेडिंग पॅटर्न आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्री अशा डिझाईनला पसंती देतात.
बोट नेक ब्लाऊजच्या गळ्याचा आकार कॉलर बोनपर्यंत पसरलेला असतो. हा अत्यंत स्टायलिश पॅटर्न आहे तुम्ही ऑफिसवेअरसाठी निवडू शकता.
पार्टीवेअर किंवा डिझायनर साड्यांवर तुम्ही वनस्ट्रीप ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता.तुमचा लूक ब्लोड आणि ग्लॅमरस दिसेल.
गोल गळ्याचे स्लिव्हलेस ब्लाऊज तुम्ही सिंपल लूकसाठी निवडू शकता. कॉटन, लिनन साड्यांसाठी हा ब्लाऊज पॅटर्न छान आहे.
स्लिव्हलेस ब्लाऊजसाठी शक्यतो पॅडेड ब्लाऊज निवडा जेणेकरून ब्रा चे स्ट्रॅप्स दिसण्याची भीती राहणार नाही.