Coronavirus New Variant JN.1 Saam Tv
देश विदेश

Coronavirus New Variant: कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे केरळमध्ये 2 जणांचा मृत्यू, कर्नाटक-तामिळनाडू अलर्ट मोडवर

Covid Latest News: जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकार समोर आला आहे. या प्रकारचं नाव JN.1 असल्याचं सांगितलं जात आहे. याचे रुग्ण भारतातही आढळून आले आहेत.

Satish Kengar

Coronavirus New Variant JN.1:

जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकार समोर आला आहे. या प्रकारचं नाव JN.1 असल्याचं सांगितलं जात आहे. याचे रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. देशात केरळ राज्यात या विषाणूची लक्षणे आढळून आली असून, त्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या संदर्भात केरळच्या शेजारील राज्य कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केरळमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे 2 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेजारील राज्य कर्नाटक देखील सतर्क झालं आहे. याबाबत कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी कोरोना व्हायरसच्या प्रकरणांबाबत सांगितले की, सध्या काळजी करण्याची गरज नाही. राज्यात कोविड-19 चे केवळ 58 रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी 11 रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत आणि उर्वरितांवर त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यांत फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्याला कोरोनासोबत इतर गंभीर आजार होते.  (Latest Marathi News)

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, आम्ही आमच्या राज्यात कोरोना व्हायरसबाबत आवश्यक पावले उचलत आहोत. केरळमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या लोकांमध्ये खोकला, फ्लू किंवा कोरोना विषाणूशी संबंधित लक्षणे दिसत आहेत, त्यांची तपासणी करून उपचारासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत.

सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. भारत सरकारने याबाबत लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सोशल इतरांपासून अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे. सरकारच्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असेही म्हटले आहे की, श्वासोच्छवासाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT