Mumbai News Saam Digital
देश विदेश

Mumbai News: अंधेरीतून दोन बांगलादेशी तरुणांना अटक, अनेक फोन कॉल्स बांगलादेशमध्ये केल्याचं उघड

Mumbai Crime News: अंधेरी परिसरातून दोन बांग्लादेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम जन्नतुन हुसैन आणि बाबर याकूब उल्ला उर्फ बाबू अशी त्यांची नावे असून अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली आहे.

Sandeep Gawade

Mumbai News

अंधेरी परिसरातून दोन बांग्लादेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम जन्नतुन हुसैन आणि बाबर याकूब उल्ला उर्फ बाबू अशी त्यांची नावे असून अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरी सहार रोड गोखले पुलाखाली वेल्डरचे काम करण्यासाठी हे दोन बांगलादेशी तरुण येणार असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली होती. या माहितीची खात्री करताच अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने साध्या वेशात पाळत ठेवून सद्दाम हुसेन १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. दुसऱ्या कारवाईत याच पथकाने बाबर उल्ला या 24 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतेही कागदपत्र आढळली नाहीत. मात्र त्याचे अनेक फोन कॉल्स हे बांगलादेशमध्ये झाल्याचे आढळल्याने त्याला देखील ताब्यात घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Male Infertility: मधुमेह वाढवतो पुरुष वंध्यत्वाचा धोका? शुक्राणूंच्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घ्या

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?

Bor Fruits Benefits: थंडीत बोरं खाण्याचे फायदे काय?

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओतील तरूण रस्त्यावर? लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT