Twitter Down Saam Tv
देश विदेश

Twitter Down : जगभरातील ट्विटर डाऊन, लॉग इन करण्यात अडचण; नेटकरी हैराण

वृत्तसंस्था

Twitter Down : जगातील अनेक भागांमध्ये ट्विटर (Twitter) हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म डाऊन झाले आहे, काही वापरकर्त्यांना ट्विटर वापरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही लोकांना ट्वीटर वापरण्यास काहीच अडचण येत नाही तर काही लोकांना ट्वीटरचा वापर करताना अडचणी येत आहेत अशी माहिती DownDetector ने दिली आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचा ताबा घेतल्याने ट्विटर गेल्या एका आठवड्यापासून सतत चर्चेत आहे.

शुक्रवारी सकाळी, अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर समस्या नोंदवल्या.अनेकांनी सांगितले की ते ट्विटरवर लॉग इन करू शकत नाहीत. वापरकर्त्यांनी स्क्रीन शॉट्स केले आहेत. ज्यामध्ये लॉगिनमध्ये समस्या असल्याचे दिसून येत आहे. लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना "Something went wrong, but don’t fret — let’s give it another shot असे संदेश लिहून येत आहे.

DownDetector या साईटने दिलेल्या माहितीनुसास ट्विटर आउटेज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुरु झाले. सकाळी 7 च्या सुमारास ही समस्या आणखी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, DownDetector च्या मते, ट्विटर डाऊन झाल्यामुळं भारतातील फार कमी भाग प्रभावित झाला आहेत.

ब्लू टिकसाठी मोजावे लागणार पैसे

एलोन मस्क यांनी ट्विटरवर नुकताच एक आठवडा पूर्ण केला आहे. या दरम्यान बऱ्याच घडामोडी देखील घडल्या आहेत. ट्विटरची मालकी मिळताच सर्वात अगोदर त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक सहकाऱ्यांची हकालपट्टी केली. यानंतर मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक असलेल्या यूजर्सना म्हणजेच व्हेरिफाईड बॅड्ज असलेल्या वापरकर्त्यांना आपलं ब्लू टिक अबाधित राखण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. म्हणजेच यापूर्वी मोफत असलेलं हे ब्लू टिक आता पैसे देऊन वापरावं लागणार आहे.

ट्विटर हेडकॉर्टरमध्ये पोहोचल्यानंतर मस्क यांनी 'the bird is freed' म्हणजे पक्षी आता मुक्त आहे असं ट्विट केलं होतं. यावरुन आगामी काळात ट्विटरमध्ये मस्क हे मोठे बदल करणार असल्याचे संकेत मिळतायत. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ...अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील टीकेला CM शिंदेंनी दिलं जशास तसे उत्तर

Adani Group: राज्यातील शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे? महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप

Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

Uddhav Thackeray: 15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं

Uddhav Thackeray : भाजपच्या रोपट्याला गुलाबी अळी लागली, ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागली

SCROLL FOR NEXT