Money saam tv
देश विदेश

अबब! बँक अकाउंटमध्ये २५००००००० झाले जमा; दुसऱ्या दिवशी काढायला गेला, पण...

तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम आपल्या खात्यावर अचानकपणे जमा झाल्याने त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावरच उरला नाही.

नरेश शेंडे

प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात गडगंज श्रीमंतं (Rich) व्हावं असं नेहमीच वाटतं. काही जण रोडपतीवरुन करोडपती होण्याची स्वप्न (Dream) तर उराशीच बाळगून बसलेले असतात. कोट्यावधी रुपयांचा असंच स्वप्न बघणाऱ्या एका व्यक्तीच्या खात्यात अचानाकपणे पैशांचा पाऊस पडला. तब्बल २५ कोटी रुपयांची (twenty five crore) रक्कम आपल्या खात्यावर अचानकपणे जमा झाल्याने त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता कोट्यावधी रुपये मिळालेत मग खर्च तर करावं लागणार, असा विचार करत त्या व्यक्तीनं एक प्लॅन केला. पण सत्य परिस्थिती (Fact) समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आणि त्या व्यक्तीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार, रातोरात करोडपती झालेला हा व्यक्ती ब्रिटनचा असून मायकल कार्पेंटर असं त्यांचं नाव आहे. मायकलच्या खात्यात अचानकपणे कोट्यावधी रुपये जमा झाले. त्यानंतर मायकला खूश झाला आणि पैसे खर्च करण्यासाठी प्लॅन करु लागला.जेव्हा सत्य परिस्थिती मायकला माहित झाली तेव्हा मात्र मायकल पुरता निराश झाला. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून मायकलने १ कोटी रुपयांची गुंतवणूक स्टॉक्स फर्ममध्ये Hargreaves Lansdown केली होती. एका दिवस सकाळी उठल्यावर मायकलला सुखद धक्काच बसला. मायकलने गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर त्याच्या स्टॉक्समध्ये २२०० प्रतिशतनुसार रिटर्न मिळून खात्यात २५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असल्याचं मायकलने पाहिलं.

Bank account details

त्यानंतर मायकलला विश्वासच बसला नाही, की त्याच्या खात्यात कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत.पण मायकलने सतत खातं तपासल्यावर २५ कोटी रुपये खरोखर जमा झाले असल्याचं त्यानं पाहिलं. त्यानंतर मायकलला खूपच आनंद झाला.त्यानंतर अचानक मायकलचे विचार बदलले आणि त्याला प्रश्न पडला की, कुणीही रातोरात एवढा स्टॉक कसं काय वाढवू शकतो ?

खात्यात एवढे पैसे कसे जमा झाले ?

खात्यातील पैशांबाबत खातरजमा करण्यासाठी मायकलने Hargreaves Lansdown फर्मला फोन केलं. जेव्हा त्या फर्मने खात्याची तपासणी केली तेव्हा चित्रच पालटलं. " एररमुळे मायकलच्या खात्यात एवढे पैसे जमा झाल्याचं दिसतंय. ग्राहकाच्या खात्यात एक स्टॉकची जमा झालेली रक्कम चुकीची आहे. त्या रक्कमेत बदल केलेला आहे."असं कंपनीच्या एका प्रवक्त्यानं मायकलला सांगितलं. ही माहिती मिळाल्यानंतर मायकल खूपच निराश झाला. खात्यात एवढे पैसे जमा झालेत, काहीतरी गडबड आहे,अशी शंका मायकलला आधीच होती. त्यामुळे सत्यता जाणून घेण्यासाठी मायकलने कंपनीला फोन केला.त्यानंतर मायकलला झालेला सर्व प्रकार माहिती झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

SCROLL FOR NEXT