Thalapathy Vijay arrives for the swearing-in ceremony at Nehru Stadium, Chennai, ahead of taking oath as Tamil Nadu Chief Minister. saam tv
देश विदेश

तमिळनाडूमध्ये राजकीय घडमोडींना वेग; थलपती विजय उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

तमिळनाडूमध्ये मोठी राजकीय घडामोड वेग आला असून टीव्हीके प्रमुख थलपती विजय उद्या चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Omkar Sonawane

चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात उद्या एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेते विजय थलपती यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे. पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांशी चर्चा केली आणि सत्तास्थापनेचे पत्र सोपवले. उद्याचा दिवस तामिळनाडूच्या राजकीय इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

कुठे होणार शपथविधी

स्थळ: नेहरू स्टेडियम, चेन्नई.

वेळ: उद्या सकाळी १०:०० ते ११:१५ च्या दरम्यान.

महूर्त: प्रशासकीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा 'शुभ मुहूर्त' शपथविधीसाठी निवडण्यात आला आहे.

क्षमता: नेहरू स्टेडियमची आसनक्षमता ५,००० इतकी असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक कामे पूर्ण करून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत स्टेडियम प्रशासनाच्या स्वाधीन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय सकाळी १० वाजेपूर्वीच स्टेडियमवर पोहोचतील. त्यानंतर सकाळी १० ते ११:३० या वेळेत, राज्यपालांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार, ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. संपूर्ण तामिळनाडूमध्ये या सोहळ्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार

सिद्धरामय्यांचा राजीनामा; कर्नाटकातील नेतृत्वबदलाची इनसाईड स्टोरी काय? VIDEO

8th Pay Commission: गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वाढीव पगार आणि एरियर कधीपर्यंत मिळणार?

Friday Horoscope : संकटाचा सामना करावा लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार

सर्वात मोठा पक्षप्रवेश! 25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंचा 'मविआला' हादरा

SCROLL FOR NEXT