TTP attack on Pakistan 
देश विदेश

Breaking News : पाकड्यांना पळता भुई थोडी, २० पाकिस्तानी सैन्याचा खात्मा, देशात हाहाकार

TTP attack on Pakistan : दक्षिण वझिरिस्तानमध्ये टीटीपीने पाकिस्तानच्या लष्करी तळावर जोरदार हल्ला करत २० सैनिकांचा खात्मा केला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला पाकिस्तानसाठी मोठं आव्हान ठरत आहे.

Namdeo Kumbhar

TTP attack on Pakistan News : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला हादऱ्यावर हादरे बसत आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. भारताने दिलेल्या जोरदार हादऱ्यातून पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याचा प्लान आखत असताना मोठा हादरा बसलाय. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीने पाकिस्तानच्या सैन्यावर जोरदार हल्ला केला. टीटीपीने पाकिस्तानच्या २० सैनिकांचा खात्मा केला. टीटीपी आणि बलुच आर्मीकडूनही पाकिस्तानवर हल्ला केला जातोय. त्यातच इम्रान खान याच्या समर्थकांकडूनही पाकिस्तानमध्ये आंदोलन केले जात आहे. त्यामुळे पाकिस्तान चारी बाजूने अडचणीत आल्याचे चित्र आहे.

दक्षिण वझिरिस्तानमधील तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या जोरदार हल्ल्यात २० पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाया तीव्र केल्या आहेत. त्यातच टीटीपीने पाकिस्तानला जोरदार हादरा दिला. त्यामुळे पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढावलेय. टीटीपीने शुक्रवारी दक्षिण वझिरिस्तानच्या शकाई उपविभागातील डांगेट लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात २० पाकिस्तानी सैनिक ठार झालेत.

प्राथमिक माहितीनुसार, टीटीपीने लेझर रायफल्सचा वापर करत पहिल्या टप्प्यात सहा सैनिकांना ठार केले. त्यानंतर जोरदार गोळीबार केला अन् शस्त्रांचा वापर झाला. मांतोई भागातून मदतीसाठी पाठवलेला लष्करी ताफा अर्ध्यावर अडवला. टीटीपीने पाकिस्तानच्या सैन्याची दोन वाहने उद्ध्वस्त केली. टीटीपीच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या २० सैनिकांचा मृत्यू झालाय. तर पाच जखमी झाले आहेत. टीटीपीने पाच रायफल्स, एक रॉकेट लाँचर, नाइट व्हिजन उपकरणे आणि इतर लष्करी साहित्य जप्त केल्याचेही म्हटले आहे.

टीटीपीने हा हल्ला शवालमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून केल्याचा दावा केलाय. शवलामधील पाकड्यांच्या हल्ल्यात म्होरक्या मुसाब ठार झाला होता. त्याचा बदला टीटीपीने घेतला. त्याशिवाय भविष्यात अशा हल्ल्यांचा इशारा दिलाय. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे सीमेवर तणाव वाढत असताना, टीटीपीच्या या हल्ल्याने पाकिस्तानपुढे अंतर्गत सुरक्षेचे आव्हान निर्माण झालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये मान्सुन पुन्हा सक्रिय

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

VIRAL VIDEO: ३ लाख रूपयांत ट्रेनचा कोच बुक केला अन् केली पूजा; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Rain Alert : राज्यात २१ जुलैनंतर जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? वाचा

SCROLL FOR NEXT