Donald Trump comments on Israel PM election ANI
देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा! म्हणाले, "नेतान्याहू माझ्या इशाऱ्यावर चालणार, इस्रायलमध्ये माझी ९९% लोकप्रियता"

Donald Trump Israel statement : इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलमध्ये आपण ९९% लोकप्रिय असल्याचा दावा करत पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केले.

Namdeo Kumbhar

Donald Trump comments on Israel PM election : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. ट्रम्प यांनी असा दावाही केला की, ते इस्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवू शकतात.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे मी सांगेन ते करतील, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. नेतान्याहू खूप चांगले आहेत. मी त्यांना जे करायला सांगेन, तेच ते करतील. माझ्या मते, इस्रायलमध्ये त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. सध्या इस्रायलमध्ये माझी लोकप्रियता ९९% आहे. मी पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवू शकतो. असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांच्या या खोचक वक्तव्यानंतर जगभरातील एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, इराणविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्याची तयारी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. इराणविरोधातील वाढणाऱ्या तणावाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, करार करण्यासाठी कोणतीही घाई नाही. त्यांना आणखी एक संधी देऊ, पण मला घाई नाही. जीवितहानी कमीत कमी करणे हे माझे ध्येय आहे. दरम्यान, जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर आणखी एक मोठा हल्ला होऊ शकतो, असा इशारा काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इराणला दिला होता.

युद्धात अमेरिकेनं गमावली 42 लढाऊ विमानं | US Fighter Jets

इराणचे हवाई दल आणि नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला चालू संघर्षात स्वतःलाच खूप मोठा फटका बसला आहे. इराण विरोधातील लष्करी कारवाईत अमेरिकेने आपली तब्बल ४२ विमाने गमावली आहेत. यामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने (Fighter Jets) आणि लष्करी ड्रोन्सचा समावेश आहे. एका ताज्या अहवालानुसार, या युद्धासाठी अमेरिकेचा एकूण खर्च आतापर्यंत २९ अब्ज डॉलर्स (अंदाजे २.४ लाख कोटी रुपये) च्या वर गेला आहे. युद्धात मोठ्या प्रमाणावर झालेला दारूगोळा आणि उपकरणांचा वापर तसेच त्यांच्या दुरुस्तीमुळे या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे अमेरिकेला आपले संरक्षण बजेट (Defense Budget) देखील वाढवावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाढदिवसाचा केक खाणं महागात पडलं, केकचा घास, 3 वर्षाच्या मुलाचा जीव धोक्यात

५००० रुपयांची लाच घेताना आरोग्य विभागाचा कर्मचारी रंगेहाथ सापडला; एसीबीने कार्यालयात रचलेला सापळा

इराण-अमेरिकेत पुन्हा युद्ध पेटणार? इराणनं पाडलं अमेरिकेचं हेलिकॉप्टर

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; शिंदे हायस्कूलजवळ एकावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या

अण्वस्त्र सज्जत्तेत भारताचं सर्वात मोठं पाऊल, भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रं तैनात

SCROLL FOR NEXT