Trump Putin Meeting saam tv
देश विदेश

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Trump Putin : डोनाल्ड ट्रम्प यांची भारताविरोधातील टॅरिफ ब्लॅकमेलिंग आता थांबण्याची शक्यता आहे... त्याची कारणं डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीत आहेत.. मात्र या भेटीत नेमकं काय घडलं? पाहूयात....

Bharat Mohalkar

Trump Putin Meeting : भारताविरोधात 50 टक्के टॅरिफची घोषणा आता रद्द होणार..?.. कारण ज्या रशियासोबतच्या तेल व्यापारावरुन ट्रम्प यांनी टॅरिफ ब्लॅकमेलिंग सुरु केल होतं.. त्याच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ट्रम्प यांची अमेरिकेच्या अलास्कामध्ये तब्बल 3 तास बैठक झालीय...या बैठकीत नेमकं काय घडलंय? पाहूयात....

ट्रम्प आणि पुतीन यांच्या बैठकीत रशिया युक्रेन युद्धावर चर्चा झाली.. मात्र..युक्रेनच्या सहभागाशिवाय चर्चा पूर्ण होऊ शकत नसल्यांनं कुठलाही करार कऱण्यात आला नाही. तरीही बैठक सकारात्मक झाल्याचं ट्रम्प याचं म्हणंण आहे... दुसरीकडे व्लादिमीर पुतीन यांनीही रशियाची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं म्हटलंय...तसंच पुढील बैठकीसाठी ट्रम्प यांना मॉस्कोत निमंत्रण देण्यात आलंय...

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आणि भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली.. त्यामुळेच पुतीन यांनी बैठकीसाठी प्रयत्न सुरु केल्याचा अजब दावाच ट्रम्प यांनी केलाय.. असं असलं तरी ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? पाहूयात...

ट्रम्प आणि पुतीन भेटीत सकारात्मक तोडगा निघाल्यास भारतावरचा टॅऱिफ रद्द होण्याची शक्यता आहे.. त्याबरोबरच ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय निर्यातील बसणारा 10 अब्ज डॉलरचा फटका वाचण्याची शक्यता आहे...तसंच कृषी, मासेमारी आणि औषध उद्योग क्षेत्राला दिलासा मिळणार आहे..

रशियाने 1867 मध्ये अमेरिकेला 72 लाख डॉलरला विकलेल्या अलास्कामधील बैठकीनंतर आता निमंत्रणानुसार मॉस्कोत ट्रम्प-पुतीन भेटीची शक्यता आहे... या भेटीत सकारात्मक तोडगा निघाल्यास रशिया युक्रेन युद्ध थांबण्यासोबतच अमेरिकेने भारतावर लादलेला 50 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT