डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका saam tv
देश विदेश

Iran - US War: युद्धाच्या आगीत डोनाल्ड ट्रम्प स्वतःच होरपळले; अमेरिकी प्रशासनात भडका, नेमकं काय घडलं?

joseph kent resignation exposes us internal conflict over iran : इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धामुळं ट्रम्प सरकार आणि प्रशासनामधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरच्या प्रमुखांनी नाराजीमुळं राजीनामा दिला आहे.

Nandkumar Joshi

इराण-इस्रायल युद्धात तेल ओतून 'भडका' उडवून देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनाच आता त्याची झळ बसू लागली आहे. अमेरिकेला इराणकडून कोणताही धोका नव्हता, असं सांगतानाच युद्धखोरीला विरोध करत अमेरिकेच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे प्रमुख जोसेफ केंट यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

जोसेफ केंट यांनी इराणविरुद्धच्या युद्धाला उघडपणे विरोध दर्शवून नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. युद्धामुळं पदाचा राजीनामा देणारे ट्रम्प प्रशासनातील ते पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय. मी या युद्धाचं समर्थन करू शकत नाही. इराणकडून अमेरिकेला सध्या तरी कोणताही धोका नव्हता. हे युद्ध इस्रायल आणि त्यांच्या प्रभावशाली लॉबीच्या दबावाखाली सुरू करण्यात आलं, असं केंट यांनी नमूद केलं आहे.

एखाद्या देशावर हल्ला चढवणे किंवा युद्ध सुरू करण्यासाठी त्या देशाकडून तात्काळ धोका असणे आवश्यकत असते, असं या विषयातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंट यांच्या वक्तव्यामुळंच या युद्धनीतीवरच शंकेचं धुरकं जमा झालंय. केंट यांच्या नाराजीनाम्यानंतर व्हाइट हाउस आणि राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या कार्यालयाकडूनही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प प्रशासनातील या घडामोडीमुळं गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

जोसेफ केंट हे नॅशनल इंटेलिजेंसच्या तुलसी गबार्ड यांचे जवळचे मानले जातात. गबार्ड यांनी इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतरही खूप कमी वेळा जाहीरपणे वक्तव्ये केली आहेत. ४५ वर्षीय केंट अमेरिकी स्पेशल फोर्स आणि सीआयएचे अनुभवी अधिकारी राहिलेले आहेत. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत होते. त्यांची पत्नी शेनन केंट यांचा २०१९ मध्ये सीरियात झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढलेला असतानाच केंट यांनी राजीनामा दिला आहे. केंट यांच्या राजीनाम्यामुळं अमेरिका सरकारमध्येही युद्धावरून निर्माण झालेले मतभेद जगासमोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT