भारतातील रेल्वेगाड्यांमध्ये जनरल आणि स्लीपर डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी काही नवी नाही, मात्र आता एसी डब्यांमध्ये देखील धक्काबुक्की वाढली आहे. सोशल मीडियावर अलिकडे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री आणि आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. पुढच्या पाच वर्षात जवळपास सर्व रेल्वे प्रवाशांना कन्फर्म टिकटी मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे वेटिंगच्या झंझटीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.
मागच्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेत अविस्मरणिय बदल केले आहेत. येत्या पाच वर्षात रेल्वेची क्षमता इतकी वाढवली जाईल, की रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सहज कन्फर्म तिकीट मिळणार आहे. त्याचसोबत रेल्वेतील सुविधाही वाढवण्यात येणार आहेत.
२०१४ ते २०२४ पर्यंत ३१ हजार किमीचे नवे रेल्वे ट्रॅक उभारण्यात आले. मात्र २००४ पासून २०२४ पर्यंत केवळ ५००० किमी रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण करण्यात आलं. मात्र, गेल्या १० वर्षात ४४००० किमी रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मनमोहन सिंग यांच्या सरकारशी तुलना करताना अश्विनी वैश्वव म्हणाले, २००४ ते २०१४ या काळात केवळ ३२००० नवीन कोच बनवले गेले. तर २०१४ ते २०२४ पर्यंत ५४००० नवीन डबे जोडण्यात आले. २०१४ पर्यंत एकही किलोमीटरही समर्पित मालवाहतूक सुरू करण्यात आलेली नव्हती. तर आता २, ७३४ किमी मालवाहतूनक मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.