Train Traveling :रेल्वे प्रवास करताना अपघाताच्या अनेक घटना घडतात. वारंवार सूचना देऊनही प्रवासी सर्रास चालत्या ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना दिसतात. यामुळे पाय घसरून किंवा ट्रेनचा वेग जास्त असल्याने प्रवाशांना त्यांचा तोल सावरता येत नाही. परिणामी ते खाली घसरून पडतात. सध्या अपघाताची अशिच एक थरारक घटना समोर आली आहे. यामध्ये एक महिला तिच्या बाळाला घेऊन चालत्या ट्रेनमधून खाली पडते. (Latest Train Traveling News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील ही घटना आहे. या घटनेत महिला आपल्या मुलाला घेऊन प्रवास करत असते. ती ट्रेन व्यवस्थित पकडते. नंतर तिच्या लक्षात येतं की, ही ट्रेन वेगळ्याच ठिकाणी निघाली आहे. आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो आहोत हे समजताच महिला घाबरते काय करावे हे तिला सूचत नाही आणि आपल्या बाळासह ती चालू ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी घेते. यामध्ये महिला प्लॅटफॉर्मवर पडते. खाली उडी घेतल्यावर तिथे असलेल्या जीआरपी जवानाच्या लक्षात येते आणि तो तिचा जीव वाचवतो.
सदर घटना स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलेने चालू ट्रेन सोडण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या बाळाच्या जीवावर देखील बेतला असता. मात्र लगेचच जीआरपी जवानाने सतर्क राहत खाली पडलेल्या महिलेला आणि तिच्या बाळाला मागे खेचलं. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे. शैलेंद्र धैर्या असं जीआरपी जवानाचं नाव आहे. व्हिडिओ पाहून त्यांनी केलेल्या कामामुळे त्याचं मोठं कौतूक होत आहे.
यूपी पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नागरिकांना अशी घाई करू नये असं यामधून सांगितलं जात आहे. ट्रेनमधून प्रवास करताना स्वत:ची काळजी घेत प्रवास करणे महत्वाचे आहे. काही नागरिक चालत्या ट्रेनमध्ये चढणे उतरणे या व्यतिरिक्त अन्य करामती देखील करतात. बऱ्याचदा ट्रेनमध्ये जागा नसतानाही लटकून प्रवास केला जातो. तसेच काही व्यक्ती बसण्यासाठी जागा असली तरी देखील ट्रेनमध्ये दरवाजाला लटकून प्रवास करतात. यामुळेही अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.