Five killed and six injured after car falls into gorge in Kupwara saam tv
देश विदेश

Accident: भीषण अपघात! कार खोल दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू

Kupwara Accident: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील करनाह परिसरात कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

  • जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील करनाह परिसरात भीषण कार अपघात झाला.

  • कार खोल दरीत कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

  • अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जीएमसी हंदवाडा येथे उपचार सुरू आहेत.

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील करनाह परिसरात एक भीषण अपघात झालाय. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झालेत. जखमी झालेल्यांना जीएमसी हंदवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये महिलांसह पुरुष आणि मुलांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय.

जम्मू-काश्मीर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केलाय. आपल्या शोक संदेशात सिन्हा म्हणाले की, कुपवाडामध्ये दुर्दैवी घटना घडलीय. सिन्हा यांनी मृतकांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केलीय. जखमींना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात अशा सुचना उपराज्यपाल सिन्हा यांनी जिल्हा प्रशासनाला दिलीय.

खोल दरीत कार कोसळली, ६ जणांचा मृत्यू

मागील महिन्यातही जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात असलेल्या सुरनकोटच्या शेलधर परिसरात असा एक अपघात घडला होता. वाहन अनिंयत्रित झाल्यानंतर हे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. पुंछचे सीएमओ डॉ. परवेझ खान यांनी दिलेल्या महितीनुसार मृतकांमध्ये ४ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. या सर्वांचे वय २० ते २४ दरम्यान होते.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी पुंछ सुरनकोट येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला होता. तसच अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांची सांत्वन करत त्यांना धीर दिला होता. तसेच जखमींना योग्य उपाचर मिळावेत यासाठी प्रशासनाला आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

Cancer Medicine: कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, १३७ औषधांच्या किमती झाल्या कमी

SCROLL FOR NEXT