Security agencies detain terror suspects linked to a toy car bomb plot targeting Delhi. Saam tv
देश विदेश

मुंबईत बसून दिल्ली हादरवण्याचा डाव, जैशच्या दहशतवाद्याचं टॉय कनेक्शन

Terror Module Linked To Jaish-e-Mohammed: मुंबई बसून दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव स्पेशल सेलनं कसं उधळून लावलाय... जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचं टॉय कनेक्शन कसं समोर आलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे देशावरचं दहशतवादी संकट टळलयं... होय पाकिस्तानमधील 'जैश-ए-मोहम्मद' या संघटनेच्या इशाऱ्यावर देशाच्या राजधानीला हादरवून टाकणारा घातपाताचा कट महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावलाय.. मुंबई आणि ठाण्यातून 2 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या मोडस ऑपरेंडीनं तपास यंत्रणाही चक्रावून गेलेत..

दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

दिल्लीत खेळण्याच्या कारचा वापर करून स्फोट घडवण्याचा डाव जैश- ए- मोहम्मदच्या या दहशतवाद्यांनी आखला होता... त्यामुळे दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसनं कुर्ला-खडवलीत कारवाई केली...कुर्ला परिसरातून मोहम्मद हमाद सलाउद्दीन मेहमूदअली सिद्दीकी आणि ठाण्यातून मोसीब अहमद इफ्तेखार अहमद या 'जैश-ए-मोहम्मद'च्या थेट संपर्कात असणाऱ्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय...संशयितांच्या ताब्यातून संवेदनशील कागदपत्रं, डिजिटल उपकरणं आणि आक्षेपार्ह साहित्य हस्तगत करण्यात आलंय...

याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी साम टिव्ही थेट कुर्ल्यातील संशयित दहशतवाद्याच्या घरी पोहचलं...त्यावेळी कुर्ल्यातील स्टेशन परिसरात संशयिताच्या घरी त्याचे वडील राहत असल्याचं समोर आलं.... या कारवाईनंतर मुंबई आणि दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय... गल्लीबोळात लपलेल्या या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी तपास यंत्रणा आता युद्धपातळीवर काम करतेय... मात्र देशाच्या राजधानीत होणारा संभाव्य हल्ला टळला असला, तरी जैश- ए-मोहम्मदचे हे नापाक मनसुबे देशात राबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दहशतवाद्यांच्या मुसक्या वेळीच आवळायला हव्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT