Supreme Court  Saam Tv
देश विदेश

TMC नाव आणि चिन्हाच्या वादावर मोठी अपडेट; शिवसेना पक्ष-चिन्ह वादाचाही सुप्रीम कोर्टाकडून उल्लेख

TMC party name symbol dispute explained : तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह या वादावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय घेण्यासंदर्भात विचारणा केली आहे. निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Nandkumar Joshi

तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. या प्रकरणात अंतिम निर्णय कधीपर्यंत घेतला जाईल, अशी विचारणा सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी निवडणूक आयोगाला केली.

याबाबत ममता बॅनर्जी यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणात निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंत अंतिम निर्णयाबाबतची कालमर्यादा सांगावी, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सध्या ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगाचे प्रमुख असून, या वादावर आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय.

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या (AITC) दोन विरोधी गटांमधील नाव आणि चिन्हाचा वाद लवकरात लवकर मिटवला पाहिजे, असं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे. यावेळी कोर्टानं शिवसेनेतील पक्ष आणि चिन्हाच्या वादाचाही उल्लेख केल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्हे

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींच्या गटाला तात्पुरत्या स्वरूपात 'ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह दिलंय. तर दुसऱ्या गटाला 'डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि पाकिट (लिफाफा) हे चिन्ह दिलंय. यापूर्वी निवडणूक आयोगानं पक्षातील अंतर्गत वाद मान्य केल्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि त्यांचे मूळ फूल आणि गवत हे चिन्ह गोठवलं होतं.

या प्रकरणी अंतिम निर्णयापर्यंत दोन्हीपैकी कोणत्याही गटाला पक्षाचे मूळ नाव किंवा चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाची ही तात्पुरती व्यवस्था आगामी पोटनिवडणुकांपर्यंत लागू राहील. दोन्ही गटांचे उमेदवार आयोगाने दिलेली वेगळी नावं आणि चिन्हावर निवडणूक लढतील. निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूंनी पक्षाचे नाव, चिन्ह आणि वर्चस्वावर आपापले म्हणणे मांडले आहे. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी कागदपत्रे सादर केली आणि आयोगासमोर आपली बाजू मांडली.

हा वाद समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे संघटन, अधिकृत पदाधिकारी, पक्षाची मालमत्ता, नाव आणि चिन्हासह अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंकडून कागदपत्रे आणि उत्तरे मागितली आहेत. आता सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला या संपूर्ण वादावर अंतिम निर्णय घेण्याची निश्चित वेळ काय असेल याचे उत्तर देण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT